महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेचे राहुल शेवाळे पोहोचले दर्ग्यात - loksabha

महायुतीचे दक्षिण- मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी मुंबईतील विविध धार्मिक स्थळी जाऊन भेट दिली. यावेळी त्यांचा सर्वधर्मसमभाव दिसून आला.

निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेचे राहुल शेवाळे पोहोचले दर्ग्यात

By

Published : Apr 8, 2019, 7:15 PM IST

मुंबई - महायुतीचे दक्षिण- मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी मुंबईतील विविध धार्मिक स्थळी जाऊन भेट दिली. यावेळी त्यांचा सर्वधर्मसमभाव दिसून आला.

महायुतीचे दक्षिण- मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मुंबईतील विविध धार्मिक स्थळी जाऊन भेट दिली.

शेवाळे यांनी सुरुवातीला सहकुटुंब सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केले. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन शेवाळे यांनी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून शेवाळे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. अखेर माहिमच्या दर्ग्यात जाऊन शेवाळे यांनी फुले वाहिली.

ABOUT THE AUTHOR

...view details