मुंबई -शिवसेनेचा विधानसभा निवडणुकपूर्व 'वचननामा' उद्या सकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित होणार आहे. या वचननाम्यात मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पडणार असल्याचे समजत आहे. त्यापैकी प्रत्यक्षात किती आश्वासनांची पूर्तता होते. हे शिवसेना सत्तेत आल्यावर स्पष्टं होईल.
शिवसेनेच्या 'वचननामा' मध्ये काय असतील संभाव्य आश्वासने -
१) फक्तं १० रुपयांत सकस जेवणाची थाळी
२) विद्यार्थ्यांना वाहतुकीत विशेष सवलत
३) वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना
४) महिला सक्षमीकरणावर भर