महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रंगशारदा हॉटेल बाहेर राजकीय घडामोडींना वेग, शिवसेना आमदारांना द रिट्रीट मध्ये हलवणार? - मुंबई राजकारण लेटेस्ट न्यूज़

रंगशारदा हॉटेल मध्ये ठेवलेल्या शिवसेना आमदारांना दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. त्यांना द रिट्रीट हॉटेलमध्ये स्थलातंर करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

रंगशारदा हॉटेल बाहेर राजकीय घडामोडीना वेग

By

Published : Nov 8, 2019, 2:53 PM IST

मुंबई -रंगशारदा हॉटेल मध्ये ठेवलेल्या शिवसेना आमदारांना दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. यासाठी दोन एसी बसेस मागवल्या गेल्या आहेत. आमदारांना कोणत्या स्थळी हालवले जाणार आहे, हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. आज सभागृहाचा कार्यकाळ संपत आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदाची मागणी लावून धरत आहे. आमदार फुटू नये म्हणून शिवसेकडून दक्षता घेतली जात आहे.

रंगशारदा हॉटेल बाहेर राजकीय घडामोडीना वेग

वांद्र्याच्या रंगशारदा हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व ६४ आमदारांना द रिट्रीट हॉटेलमध्ये स्थलातंर करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गुरूवारी दुपारपासून आमदारांना रंगशारदामध्ये ठेवून आज २४ तास होत आले. येथे एका खोलीत ४ आमदार राहत आहेत. असुविधा असल्याने आमदारांना हलवण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details