महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'इरडा'ने टाळाटाळ केल्यास शिवसेना आणणार हक्कभंग प्रस्ताव - उद्धव ठाकरे - Insurance Regularity Development Corporation

ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

उद्धव ठाकरे

By

Published : Aug 2, 2019, 11:44 PM IST

मुंबई -इन्शुरन्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे इन्शुरन्स रेग्युलरिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (इरडा) असून ते त्यांनी करावे. शिवसेनेचे खासदार इरडाच्या अध्यक्षांना दिल्लीत भेटून विमा कंपन्यांबाबत जाब विचारणार आहेत. यावेळी इरडाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली तर शिवसेनेचे खासदार अध्यक्षांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणतील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मातोश्रीवर आज पीक विमा संदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, मागील दीड महिन्यात शिवसेनेच्या आंदोलनामुळे साडे अकरा लाख शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये मिळवून देऊ शकलो. पीक विमा आंदोलन सकारात्मक पार पडले. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. या बैठकीला मंत्री सुभाष देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर आणि कृषी मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.

पीक विमाबाबत दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. ज्या काही नियमांमुळे शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहतात त्यात बदल करण्याची मागणी खासदारांनी मोदी यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती शिवसेना खासदारांनी दिली. तसेच याबाबत मंगळवारी ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन पीक विम्याबाबत आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details