मुंबई - आयएनएस विक्रांत जहाज ( ins vikrant scam ) वाचवण्यासाठी सोमय्यांनी पैसे गोळा केले. त्यामुळे आयएनएस विक्रांत ( ins vikrant scam) प्रकरणी किरीट सोमय्या यांनी पळून न जाता चौकशीला सामोरे जावे. त्यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाने परदेशातूनही पैसे गोळा केले आहेत. त्याबाबतचा खुलासा आपण लवकरच करणार असल्याचा हल्लाबोल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
आयएनएस विक्रांतप्रकरणी काय म्हणाले राऊत ?
माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, "ते आयएनएस विक्रांत ( ins vikrant scam ) जहाज वाचवण्यासाठी सोमय्यांनी पैसे गोळा केले. त्या पैशांचे पुढे काय झाले ? हा आता पोलीस तपासाचा भाग आहे. भाजप ज्या प्रकारे राजकीय सूड भावनेने तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर आरोप करते, तसे आरोप आम्ही करत नाही. राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर करणे असे आमच्यावर संस्कार नाहीत. आम्ही कमरेखालचे राजकारण कधीही केले नाहीत, करणार नाही. हे आरोप देखील आम्ही राजकीय सूड भावनेने केलेले नसल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.