महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर 'हे' दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते' - शिवसेनेची भाजपवर टीका

बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद नसता तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, असे टीकास्त्र शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर सोडले आहे.

shiv sena mp arvind sawant
shiv sena mp arvind sawant

By

Published : May 4, 2021, 4:41 AM IST

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद नसता तर भाजप दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडला नसता, असे टीकास्त्र शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर सोडले आहे. अदर पूनावाला यांना देण्यात आलेल्या धमकीच्या मुद्द्यावरून सावंत यांनी हा निशाणा साधला आहे.

सीरमचे अदर पूनावाला यांनी एका मुलाखतीत केलेल्या एका वक्तव्यामुळे गदारोळ निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. या प्रकरणावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देत अदर पूनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. माणसाचा जीव वाचवण्याचे काम ते करतात, ते ही महाराष्ट्रात. याचा आम्हाला आदर आहे. शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, अशा शब्दात शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या आरोपांना सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्राला होणारा लसीचा पुरवठा येत्या आठवडाभरात -


महाराष्ट्राला लसींचा पुरवठा न झाल्यास पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला घेराव घालण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे राजु शेट्टी यांनी दिला होता. 'सीरम इन्स्टिट्यूटमधून लस घेऊन देशाच्या अन्य राज्यांत जाणारी वाहने रोखली जातील,' असे शेट्टी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले होते. त्यांच्या संघटनेचं नाव स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. त्यांनी त्याचा उल्लेख 'एसएस' असा केला, हे 'एसएस' म्हणजे शिवसेना समजले. पूनावाला यांना धमक्या देऊन आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचे काम कसं करणार? शिवसेनेची बदनामी करण्यासाठी आरोप केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, अशी खोचक टीकाही सावंत यांनी भाजपवर केली आहे.

हे ही वाचा -'केंद्र सरकारच्या नियोजन शून्यतेमुळेच देशभरात करोना पसरतोय'

पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का?

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. यावर बोलताना सावंत म्हणाले की, पंढरपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर विरोधकांना जर राज्यात सत्तांतर होईल, असं वाटत असेल तर पाच राज्यातील झालेल्या निवडणुकीतील बंगालच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का? असा सवालही भाजप नेत्यांना केला आहे. राज्य सरकारची प्राथमिकता कोरोना विरोधातील लढाई असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाचे संकट दूर झाल्यावरच तिसऱ्या पर्यायाबाबत चर्चा होईल, असेही सावंत यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा - एका रात्रीत लशींचे उत्पादन वाढविणे शक्य नाही- आदर पुनावाला

ABOUT THE AUTHOR

...view details