मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या निर्देश दिले होते. याला शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी दाखल केली होती. यावर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने फ्लोअर टेस्ट संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने तिन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल देण्यासाठी अर्ध्या तास घेतला होता. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, ( SC Decision About Assembly Floor Test ) असा निर्णय दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे लाईव्ह आले. त्यांनी सोशल मीडिया वरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा - यावेळी ते म्हणाले की, मला समाधान आहे की, आम्ही औरंगाबादचे अधिकृतपणे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले आहे. जे बाळासाहेब ठाकरे यांनी नाव दिलेले शहर आहेत. आज मी तुमच्यासमोर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी सांगितले. ( Uddhav Thackeray Resign Maharashtra Chief Minister Post )
राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे मानले आभार - राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. शिवसेनेचे अनिल परब, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे, हे लोक प्रस्ताव मंजूर झाले तेव्हाच उपस्थित होते, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनीही प्रस्तावाला पाठिंबा दिला, याबद्दल आभार मानले.
हेही वाचा -SC Decision About Assembly Floor Test : ठाकरे सरकारला मोठा धक्का, उद्याच बहुमत चाचणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
लोकशाहीचा पाळणा उद्या हालणार -उद्या केंद्रीय राखीव दल मुंबईत येणार आहे, लष्करही येईल. उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नका, सर्वांना येऊ द्यावं. लोकशाहीचा पाळणा उद्या हालणार आहे. उद्या तुमच्या वाटेत कोणीही येणार नाहीत, फ्लोअर टेस्टसाठी या. शिवसैनिकांना आवाहन आहे की उद्या कोणीही गोंधळ घालू नये. ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचं पुण्य जर त्यांच्या पदरात पडत असेल तर त्यांना ते मिळू दे. ते पाप माझं आहे, त्यांच्यावर विश्वास मी ठेवला, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरे भावूक झाले होते.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया - मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले.मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली. सत्ता येते सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!
शिवसैनिकाला आवाहन- उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिवसैनिकांना कोणालाही कोणीही आडवू नये. कोणालाही विरोध करु नका, असे आवाहन केले आहे.
शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय - उद्धव ठाकरे सरकारच्या शेवटची मंत्रीमंडळ बैठक सायंकाळी पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर ( Aurangabad renamed Sambhajinagar ) आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव ( Dharashiv Naming Of Osmanabad करण्याच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांच्या सहकारने मंजुरी दिली. अनेक वर्षापासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला हा महत्त्वाचा निर्णय आज अखेर मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासोबतच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव ( Mumbai Airport To Be Name As D B Patils Name ) देण्याच्या निर्णयासही मंजुरी देण्यात आली.
हेही वाचा -Cabinet Meeting Decision : औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव, मंत्रिमंडळ बैठकीत नामांतरला मान्यता