महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ चौकशीसाठी ईडी कार्यालयात - आनंदराव अडसूळ

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झालेले आहेत. अपक्ष आमदार रवी राणा व भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केलेला होता.

Shiv Sena leader Anandrao Adsul
Shiv Sena leader Anandrao Adsul

By

Published : Feb 9, 2021, 4:13 PM IST

Updated : Feb 9, 2021, 7:39 PM IST

मुंबई -शिवसेना नेते आनंदराव अडसूळ हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अडसूळ ईडी कार्यालयातून बाहेर पडले. अपक्ष आमदार रवी राणा व भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केलेला होता. याबरोबरच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आनंदराव अडसूळ यांच्या वर एचडीआयएल कंपनीकडून 1 कोटी रुपयांची देणगी घेतल्याचा आरोप केला होता यावर चौकशीची मागणीही या दोघांनी केली होती.

सिटी को ऑपरेटिव्ह बँकेत केला घोटाळा - रवि राणा

आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 91,000 खातेदारांच्या 900 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केलेली आहे. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ व त्यांचे पीए सुनील भालेराव यांच्या विरोधात तक्रार देण्यात आलेली असून या दोघांच्या नावावर असलेली बेनामी संपत्ती जप्त करून ईडी व सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे.

बँकेच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप -

आमदार रवी राणा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे 91 हजार खातेदार असून यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची खाती या बँकेत आहेत. यापैकी शेकडो जण रवी राणा यांच्याकडे येऊन त्यांनी त्यांची मेहनतीची रक्कम ही बँकेत बुडाली असल्याची तक्रार केली होती. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 900 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर याचा धक्का बसलेल्या खातेदारांपैकी आतापर्यंत 4 खातेदारांचा यामुळे मृत्यू झालेला आहे. रवी राणा यांनी आरोप केलेला आहे की की तत्कालीन बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत बँकेत जमा झालेला पैसा मोठ्या कंपन्या, बिल्डर यांना कर्ज स्वरूपात दिले होते. एवढेच नाही तर बँकेच्या पैशाचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेण्यासाठी आनंदराव अडसूळ व त्यांचे पीए सुनील भालेराव यांनी केला असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

Last Updated : Feb 9, 2021, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details