महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC कामगारांइतके सानुग्रह अनुदान BEST कामगारांना द्या; बेस्ट कामगार सेनेची मागणी - BEST Employees in Mumbai

पालिकेच्या कामगारांइतकेच सानुग्रह अनुदान बेस्ट कामगारांनाही दिवाळीपूर्वी द्यावे, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे. ल्या वर्षी पालिकेच्या कामगारांना 15 हजार 500 रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले होते. यंदा पालिकेच्या कामगारांना 20 हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान द्यावे, असे ते म्हणाले.

BEST
बेस्ट

By

Published : Oct 25, 2021, 6:48 AM IST

मुंबई -मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र, पालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्टमधील कामगारांना सानुग्रह अनुदान कमी प्रमाणात दिले जाते. यामुळे पालिकेच्या कामगारांइतकेच सानुग्रह अनुदान बेस्ट कामगारांनाही दिवाळीपूर्वी द्यावे, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे. तसेच कोविड भत्याचे 73 कोटी रुपये पालिकेने द्यावेत, अशीही मागणी सामंत यांनी केली आहे.

सानुग्रह अनुदान द्या -


बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांच्या नेतृत्वाखाली कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने महापौर पेडणेकर यांची भेट घेऊन पालिकेच्या कामगारांप्रमाणे बेस्टच्या कामगारांना सानुग्रह अनुदान द्या, अशी मागणी केली. गेल्या वर्षी पालिकेच्या कामगारांना 15 हजार 500 रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले होते. यंदा पालिकेच्या कामगारांना 20 हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याची मागणी पालिकेतील विविध कामगार संघटनांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्तीमुळे बेस्ट कामगारांना सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत तोडगा निघेल, असा आम्हाला विश्वास आहे. पालिका कामागारांइतके सानुग्रह अनुदान बेस्ट कामागारांना देण्याचा आग्रह आम्ही महापौरांकडे धरला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

73 कोटी कोविड भत्ता द्या -


कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावून बेस्ट कामगारांनी काम केले आहे. त्यांना दिवाळीपूर्वी तिसऱ्या टप्प्याचा उर्वरित 73 कोटी कोविड भत्ता देण्यात यावा, अशी मागणीही बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी केली आहे.

हेही वाचा -माझ्यावर छुप्या हेतूने कायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री करा, समीर वानखेडेंची पोलिसांना विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details