महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कुर्ल्यातील मीनाताई ठाकरे स्मशान भूमीवरुन शिवसेना मनसेत 'सामना' - मीनाताई ठाकरे स्मशान भूमी लेटेस्ट न्यूज

स्मशान भूमीस दिवंगत "मीनाताई बाळासाहेब ठाकरे" असे नाव देण्याचा ठराव मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी मांडला होता. हा प्रस्ताव मंजूरही झाला, मात्र आता सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

mumbai
मीनाताई ठाकरे स्मशान भूमी

By

Published : Aug 28, 2020, 3:08 PM IST

मुंबई - कुर्ला पश्चिम सोनापूर लेन येथील स्मशान भूमीस दिवंगत "मीनाताई बाळासाहेब ठाकरे" असे नाव देण्याचा ठराव मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी मांडला होता. हा प्रस्ताव मंजूरही झाला, मात्र आता सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे दिवंगत "माँ साहेब" महाराष्ट्राला नव्हे तर सर्व देशाला वंदनीय आहेत. त्यांचा होत असलेला अपमान खपवून घेणार नाही असे तुर्डे यांनी म्हटले आहे. ठराव रद्द केल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशाराही तुर्डे यांनी दिला आहे. यामुळे येत्या काळात मनसे आणि शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १६६ मधील मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांच्या प्रयत्नाने सोनापूर लेन येथील स्मशान भूमीस दिवंगत "मीनाताई बाळासाहेब ठाकरे" असे नाव देण्याचा ठराव पालिकेच्या सभेत ७ जानेवारी २०१९ रोजी सर्व संमतीने मंजूर करण्यात आला होता. नगरसेवक संजय तुर्डे यांनी मांडलेल्या ठरावास सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. परंतु याच विभागातील शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी दिनांक १८ मार्च २०२० रोजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना पत्र लिहून ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी याबाबात आरोग्य विभागाला पत्र लिहून स्मशान भूमीला मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आमदार संजय पोतनीस हे राजकीय द्वेषापोटी माँ साहेबांचा अपमान करीत असून पोतनीस यांच्या वैचारिक मनोवृत्तीची किव करावाशी वाटते असे म्हटले आहे. स्वर्गीय "माँ साहेब" महाराष्ट्राला नव्हे तर सर्व देशाला वंदनीय आहेत. त्यांचा होत असलेला अपमान खपवून घेणार नाही असे तुर्डे यांनी म्हटले आहे. ठराव रद्द केल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशाराही तुर्डे यांनी दिला आहे.

यामुळे येत्या काळात मनसे आणि शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान याबाबात शिवसेनेच्या पालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details