महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shinde government : शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी धक्का; नामांतराच्या निर्णयाला दिली स्थगिती

आपलं सरकार जाणार हे उद्धव ठाकरे ( uddhav Thackeray government ) यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी तातडीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने केले आहे. शहराचे नाव संभाजीनगर करा या मागणीवरून सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. याच मुद्द्यावरून गेल्या 34 वर्षांपासून अनेकवेळा संघर्ष निर्माण झाले. मात्र, संभाजीमहाराजांचे नाव देण्याचीच मागणी का केली गेली. याचं उत्तर बहुतांश लोकांना माहित नाही.

एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस

By

Published : Jul 15, 2022, 11:36 AM IST

मुंबई -राज्यामध्ये सत्तापालट होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ( uddhav Thackeray government ) आपल्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचे ( Aurangabad name changing ) नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. तसेच उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव ( Osmanabad name changing decision ) करण्याचा निर्णय आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले. मात्र महाविकास आघाडी सरकारने घेतलेले हे महत्त्वाचे तीन निर्णय एकनाथ शिंदे सरकारने थांबवले आहेत. शिंदे सरकारने या निर्णयांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात असलेल्या तात्कालीन महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत चाचणी देण्याचे आदेश दिले होते. राज्यपालांकडून असे आदेश आल्यानंतर राज्य सरकारला कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. मात्र आपलं सरकार जाणार हे उद्धव ठाकरे यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी तातडीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने केले आहे.


नवीन सरकार नामांतराचा निर्णय घेणार -सत्तेत आल्यानंतर पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास आघाडी सरकारने नामांतरांच्या घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. मात्र आक्षेप घेत असतानाच हे निर्णय योग्य असल्याचे म्हटलं होतं. मात्र राज्यपालांनी विश्वास दर्शक ठराव बाबत पत्र दिल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय पुन्हा घेऊन त्यांना तांत्रिकदृष्ट्या योग्य करावी लागतील असे सुतवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच महाविकास आघाडी सरकारने घेतलेले या निर्णयाचे स्वागतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं होतं. त्यामुळे सध्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिली असली तरी, लवकरच नामांतराचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

इतिहासतज्ज्ञांचा आक्षेप-शहराचे नाव संभाजीनगर करा या मागणीवरून सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. याच मुद्द्यावरून गेल्या 34 वर्षांपासून अनेकवेळा संघर्ष निर्माण झाले. मात्र, संभाजीमहाराजांचे नाव देण्याचीच मागणी का केली गेली. याचं उत्तर बहुतांश लोकांना माहित नाही. शिवसेना ( Shivsena ) म्हणते हा याच शहरात संभाजी महाराजांचे हाल करून मारले, त्यामुळे शहराला त्यांचे नाव द्यायचे आहे. तर दुसरीकडे महाराज फक्त दोनदा शहरातून गेले त्यांना मारल्याचे पुरावे नाहीत, असं इतिहास तज्ञाचं म्हणणं आहे. त्यामुळे हा अट्टाहास का असा प्रश्न निर्माण होत आहे.

निर्णयाची कल्पना नव्हती-अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं करण्यात आलं. तर, नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आलं. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत हात झटकले आहेत. नामांतर हा किमान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकार कक्षेत निर्णय होता. याची कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिलं ( Sharad Pawar React On Aurangabad Renaming ) आहे. पवार म्हणाले की, नामांतर हा किमान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकार कक्षेत निर्णय होता. याची कल्पना नव्हती. शासकीय धोरणाबाबत चर्चा होत होती. नामांतर ऐवजी नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला असता तर आनंद झाला असता, असेही पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा-Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतरावरुन शरद पवारांनी झटकले हात; म्हणाले, 'याची कल्पना...'

ABOUT THE AUTHOR

...view details