महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

15 ऑगस्ट पूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत; पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणासाठी शिंदे फडणवीस सरकारची लगबग - ध्वजारोहण शिंदे फडणवीस सरकार निर्णय

बंडखोर आमदारांकडून वाढणारा ( flag hoist by maharashtra Guardian Minister ) दबाव, तसेच विरोधी पक्षांकडून होणारी सततची टीका या कारणाने या आठवड्यात मंत्रिमंडळ ( flag hoist Shinde Fadnavis government decision ) विस्ताराची शक्यता ( 15 august flag hoist by Guardian Minister ) वर्तवली जात असून, स्वतंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची तयारी शिंदे गटाकडून ( Shinde Fadnavis government on flag hoist ) केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

Shinde Fadnavis government on flag hoist
मंत्रालय

By

Published : Aug 8, 2022, 11:58 AM IST

मुंबई -राज्यात उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस ( flag hoist by maharashtra Guardian Minister ) यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सत्ता स्थापन केली. मात्र, महिना उलटून गेला तरी ( flag hoist Shinde Fadnavis government decision ) राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगड कायम आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दररोज मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचा दावा करत असले तरी न्यायालयाच्या अंतिम ( 15 august flag hoist by Guardian Minister ) निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे. परंतु, बंडखोर आमदारांकडून वाढणारा दबाव, तसेच विरोधी पक्षांकडून होणारी सततची टीका या कारणाने या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात असून, स्वतंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यात ( Shinde Fadnavis government on flag hoist ) पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची तयारी शिंदे गटाकडून केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा -Election Commission Decision : आज निवडणूक आयोगासमोर शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने

१५ ऑगस्ट पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे प्रयत्न? -स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यांच्या मुख्यालयावर पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण व्हावे यासाठी त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा प्रयत्न असल्याचे समजत आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयात स्वतंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून आता महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून शिंदे - फडणवीस सरकारवर सातत्याने टीका होत आहे. बंडखोर आमदारांचा दबावही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वाढत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते? -काल दिल्लीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याचा सुतोवाच दिला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. तुमच्या कल्पनेपेक्षाही लवकरच विस्तार होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबर शिंदे गट आणि भाजप यांच्यातील खाते वाटपाबद्दलही कयास बांधले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे गृह खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहू शकते, असे भाजपच्या गोट्यातून सांगण्यात येत आहे. पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही मंत्रिमंडळात येतील आणि विस्तारानंतर नवे प्रदेशाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार असेही समजत आहे.

ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते? -मागील ३९ दिवस राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांचेच मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे. १५ ऑगस्ट पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला नाही आणि पालकमंत्री नियुक्त केले नाहीत तर जिल्हा मुख्यालयावर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे लागेल. आधीच मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिल्यामुळे शिंदे सरकारवर टीका होत आहे. त्यातच ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करावे लागले तर सरकारवर पुन्हा टीका होऊ शकते. त्यामुळे, १५ ऑगस्ट पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून ही टीका टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात १५ ते २० मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो अशीही चर्चा आहे.

हेही वाचा -Protest of IIT Bombay students : अखेर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाची दखल; 4 विद्यार्थ्यांना फी ठरविणाऱ्या समितीवर घेतले

ABOUT THE AUTHOR

...view details