मुंबई - देशभरातील कृषी क्षेत्रावर कोरोना व्हायरसच्या लॉक डाऊन परिणामांमुळे मजूर, शेतीविषयक साधने व इतर संसाधनांच्या अनुपलब्धतेमुळे संपूर्ण कृषी कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
...म्हणून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र - news about sharad pawar
देशातभरातील कृषी क्षेत्रावर कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉक डाऊनचा परिणाम झाला आहे. यामुळे शेतीविषयक साधने आणि इतर संसाधनांच्या अनुपलब्धेतमुळे कृषी कार्यात अडथळा निर्माण झाला असल्याची चिंता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहून पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली.
...म्हणून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र
भारतातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनेही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शेतकर्यांची परतफेड करण्याची क्षमता पूर्णपणे बिघडली आहे, असेही शरद पवार पत्रात म्हणाले आहेत.
कोरोना व्हायरसच्या संकटकाळात केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे त्यांचे दुः ख कमी करण्यासाठी आणि त्वरित दिलासा मिळावा, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. दरम्यान, या पत्रात परिणामांचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपायही शरद पवार यांनी सूचवले आहेत.