मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी ( Sharad Pawar will meet Sanjay Raut family ) सुनावण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सातत्याने आवाज ( Sanjay Raut family ) उठवत असल्याने आपल्यावर ही कारवाई झाली असल्याचे अटक होण्याआधी संजय राऊत म्हणाले होते. मात्र, ईडीकडून संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मौन बाळगले ( Sanjay Raut ED arrest ) जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. असे असताना आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या भांडुपमधील निवासस्थानी जाऊन भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा -Congress Protest in Mumbai : काँग्रेसच्या आंदोलनाचआधीच मुंबई पोलीसांनी दिली कारवाईची नोटीस
संसदेचे सुरू असलेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने शरद पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत. मात्र, आज सायंकाळी ते दिल्लीहून मुंबईसाठी निघणार असून, मुंबई विमानतळावरून थेट संजय राऊत यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला जाणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी घेतली होती भेट -संजय राऊत यांना ईडीकडून 31 जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान त्यांना अटक केली होती. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेटीला गेले होते. त्यांनी कुटुंबीयांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता शरद पवार हे देखील संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
हेही वाचा -Sanjay Raut Reaction on Varsha Raut ED Summons : वर्षा राऊत यांच्या समन्सवर ईडीच्या अटकेतील संजय राऊत म्हणाले...