महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अन् महेंद्रसिंह धोनी बनला भारतीय संघाचा कॅप्टन; शरद पवारांनी सांगितला किस्सा! - वानखेडे स्टेडियम मुंबई

सचिन तेंडुलकर यांच्या सूचना दिलीप वेंगसरकर यांनी सचिन तेंडुलकर यांची सूचना योग्य असल्याचं सांगितलं. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी याला भारतीय संघाची कप्तान म्हणून जबाबदारी देण्यात आली असल्याचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

शरद पवारांनी सांगितला किस्सा!
शरद पवारांनी सांगितला किस्सा!

By

Published : Oct 30, 2021, 7:27 AM IST

मुंबई - 2007 साली दक्षिण आफ्रिका मध्ये होणाऱ्या T-20 वर्ल्ड कपच्या तीन महिने आधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार राहुल द्रविड याने आपल्याकडे येऊन कप्तान पदाची जबाबदारी इतर कोणावर तरी सोपवावी. कर्णधारपद आपल्याकडे असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या खेळावर होतोय. त्यामुळे पुढच्या सामन्यासाठी मला कप्तान होता येणार नाही असं सांगितलं. साउथ आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकाला केवळ तीन महिनेच असताना कर्णधार राहुल द्रविडने अशी विनंती केल्याने आपण बुचकळ्यात पडलो होतो. राहुल द्रविडने घेतलेल्या निर्णयाबाबत त्यावेळचे संचालक दिलीप वेंगसरकर यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर कप्तान म्हणून भारतीय संघाची जबाबदारी सचिन तेंडुलकर याने घ्यावी यासाठी सचिन तेंडुलकर यांच्याशी देखील बोललो. मात्र 2007 साली असणाऱ्या संघाला कप्तान म्हणून आपल्यापेक्षाही अधिक महेंद्रसिंग धोनी हा जास्त न्याय देऊ शकतो, अशी सूचना सचिन तेंडुलकर यांनी केली.

सचिन तेंडुलकर यांच्या सूचना दिलीप वेंगसरकर यांनी सचिन तेंडुलकर यांची सूचना योग्य असल्याचं सांगितलं. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी याला भारतीय संघाची कप्तान म्हणून जबाबदारी देण्यात आली असल्याचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान हा किस्सा शरद पवार यांनी सांगून सचिन तेंडुलकर यांच्याकडे कर्णधार होण्याची संधी असताना देखील त्यांनी टीमचा आणि देशहिताचा विचार करत कर्णधारपद स्वीकारण्यात असमर्थता दाखवत आपलं देश प्रेम आणि क्रिकेट प्रेमाची प्रचीती दिली असल्याचं यावेळी शरद पवारांनी आपल्या भाषणातून आवर्जून सांगितलं.

वानखेडे स्टेडियम मधील एका स्टॅंडला भारताचे माजी कप्तान दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात आले

पाकिस्तान विरुद्धची मॅच हरलो, तरी पुढची मॅच आपण जिंकू -

नुकतीच झालेली पाकिस्तान विरुद्धची मॅच भारतीय संघ हरला असला. तरी, 31 ऑक्टोबरला होणारी न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्धची मॅच भारतीय संघ नक्की जिंकेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच पाकिस्तान क्रिकेट संघ विरोधात मॅच हरल्यानंतर काही भारतीय संघातील खेळाडूंना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्या खेळाडूंच्या विरोधात असंवेदनशील प्रतिक्रिया देण्यात देण्यात आल्या. अशा घटना होऊ नये. असंही यावेळी शरद पवारांनी आपल्या भाषणात दरम्यान म्हणाले.

भारतीय संघाचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांच्या टेस्ट कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या निम्मिताने गावस्कर यांना वानखेडे स्टेडियमवर कायमस्वरुपी कक्ष भेट देण्यात आला. यासोबतच वानखेडे स्टेडियम मधील एका स्टॅंडला भारताचे माजी कप्तान दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात आले. या दोन्ही गोष्टींचा अवचित्यसाधत मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा किस्सा सांगितला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर दिलीप वेंगसरकर गुंडप्पा विश्वनाथ, सचिन तेंडुलकर आणि एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

क्रिकेट आणि राजकारणात लूज बॉल सोडायचा नाही -

"क्रिकेट असो वा, राजकारण लूज बॉल कधीही सोडायचा नाही, फटका मारायचा" असं म्हणत क्रिकेटच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या विरोधकांना इशारा दिला. तसेच कार्यक्रमादरम्यान भाषण करताना वानखेडे स्टेडियम बाबतची आठवण सांगताना आपल्याजवळ वानखेडे स्टेडियमची केवळ एकच पीच संदर्भात आठवण आहे असं म्हणतात. इंडिया-पाकिस्तान सामन्याचा शिवसेनेने केलेल्या विरोधाचे आठवण करून दिली. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची क्रिकेटमध्ये असलेली आवड आणि क्रिकेटपटू सोबत होणाऱ्या तासन्तास गप्पांची आठवणही यावेळी करून दिली. राज्य सरकारकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनची प्रलंबित असलेली कामे तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details