मुंबई -युक्रेन आणि रशिया यांच्यात संघर्ष सुरु आहे. अशात अनेक भारतीय युक्रेनमध्ये ( Indian Students in Ukraine ) अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ( Sharad Pawar spoke with EAM Jaishankar ) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बेलगोरोड (रशिया) मार्गावरून बाहेर काढण्यावर दोघांनी चर्चा केली. तसेच रोमानिया-पोलंड सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याबाबतही चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. काही केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाऊन निर्वासन मोहिमेत भूमिका बजावू शकतात, असे सुचवले होते. निर्वासन मोहिमेत समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे भारताचे विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
'ऑपरेशन गंगा' -
रशिया - युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात शेकडो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने हालचाली सुरू करून विमाने पाठवली आहे. यासाठी ऑपरेशन गंगा हाती घेण्यात आलं आहे. युक्रेनमध्ये भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गतच काल युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणण्यात आले होते.