मुंबई -लेखिका व चित्रकार ममता चिटणीस सेन यांनी रेखाटलेल्या कोकणातील निसर्ग आणि येथील मानवी जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या चित्र प्रदर्शनाचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज हस्ते उद्धघाटन झाले. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह अनेक चित्रकार आणि कलावंत उपस्थित होते. जहांगिर आर्ट कला दालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ममता सेन यांचे हे चित्र प्रदर्शन आजपासून ३ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून ते सर्वांसाठी खुले राहणार आहे.
शरद पवारांनी पाहिले आपले कोंकणचे चित्रप्रदर्शन
शरद पवार यांच्या हस्ते ममता चिटणीस सेन यांनी रेखाटलेल्या कोकणातील निसर्ग आणि मानवी जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्धघाटन झाले. या वेळी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह अनेक चित्रकार आणि कलावंत उपस्थित होते.
कोकणातील विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांमधील भूभाग, तेथील महिला, निसर्गरम्य परिसर, नद्या, समुद्र किनारा आणि येथील शेतकऱ्यांच्या जीवनाचे चित्र पाहून पवारही काही काळ यात रमले. दुपारी दिल्लीसाठी रवाना होण्याची वेळ जवळ आलेली असतानाही त्यांनी काही वेळ काढून चित्रकार ममता चिटणीस सेन यांनी काढलेल्या प्रत्येक चित्रातून साकारलेला कोकण अनुभवत याविषयी सेन यांना कौतुकाची थाप दिली. कोकणातील शेतकरी महिला आणि त्यांनी व्यापलेला आसपासचा परिसर यांनी प्रेरित होऊन तयार झालेली चित्रे या प्रदर्शनामध्ये आहेत. त्यात अलीकडील चित्रे आणि गेल्या काही वर्षांमध्ये साकारलेली चित्रे असून ती कोकणातील वास्तव मांडणारी असल्याचे दिसते.