महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भटक्या विमुक्त जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा आढावा; शरद पवारांची उपस्थिती - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

महामारी दरम्यान भटक्या विमुक्त जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत काही प्रश्न निर्माण झाले होते. या संदर्भात महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा-वसतिगृह संचालक संघाचे निमंत्रक लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत बैठकीत समस्या अवगत केल्या.

भटक्या विमुक्त जमाती
भटक्या विमुक्त जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा आढावा; शरद पवारांची उपस्थिती

By

Published : Aug 13, 2020, 12:23 PM IST

मुंबई - महामारी दरम्यान भटक्या विमुक्त जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत काही प्रश्न निर्माण झाले होते. या संदर्भात महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा-वसतिगृह संचालक संघाचे निमंत्रक लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत बैठकीत समस्या अवगत केल्या. यावेळी लक्ष्मण माने यांच्या पदाधिकाऱ्यांसह इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

आश्रम शाळांतील मूळ अडचण म्हणजे ही मुले दुर्गम डोंगराळ भागातल्या वाड्या-वस्त्या व तांड्यावरची असून त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यांना ऑनलाइन शिक्षण देणे कठीण आहे. शासनाच्या आदेशानुसार सध्या सर्व शाळा बंद आहेत. परंतु या समाजातील मुलांकडे अॅन्ड्रॉइड फोन नसल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधारात आहे. आश्रमशाळांतील सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अॅन्ड्रॉइड मोबाइल फोन पुरवण्यात येण्यासंबंधी सरकारकडून काय उपाययोजना करता येईल, हा महत्त्वाचा मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली.

सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र करावा, अशी प्रमुख मागणीही या बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणा, थकीत वेतन, शिक्षक भरती, परिपोषण अनुदान यासंदर्भातल्या मागण्या शरद पवार यांच्यासमोर अधोरेखित करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details