महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar On Raj Thackeray : अजित पवारांवर धाड म्हणजे माझ्यावर धाड; शरद पवारांचे राज ठाकरेंना 'उत्तर' - राज ठाकरे मराठी बातमी

अजित पवार यांच्यावर ईडीची धाड ( Ajit Pawar ED Raid ) पडते. मात्र, शरद पवार ( Sharad Pawar ) किंवा सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यावर धाड पडत नाही, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या 'उत्तर'सभेच्या भाषणातून केला ( Raj Thackeray Uttar Sabha ) होता. त्यावर अजित पवारांच्या घरी धाड म्हणजेच माझ्या घरी धाड, असे 'उत्तर' शरद पवारांनी दिले ( Sharad Pawar On Raj Thackeray ) आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

By

Published : Apr 13, 2022, 4:59 PM IST

मुंबई - अजित पवार यांच्यावर ईडीची धाड ( Ajit Pawar ED Raid ) पडते. मात्र, शरद पवार ( Sharad Pawar ) किंवा सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यावर धाड पडत नाही, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या 'उत्तर'सभेच्या भाषणातून केला ( Raj Thackeray Uttar Sabha ) होता. मात्र, ईडीने झाड कुठे टाकावी हे मी ठरवत नाही. तसेच, अजित पवार यांच्या घरी धाड म्हणजेच माझ्या घरी धाड, असा अर्थ होतो. अजित पवार कोणी तिसरे नाहीत. सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे चुलत भाऊ-बहीण आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त ( Sharad Pawar On Raj Thackeray ) केली आहे. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरेंच्या भाषणात भाजपाची वाक्य -शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे यांनी केलेल्या सर्व भाषणात भाजपाची वाक्य होती. भाजपाने राज ठाकरे यांना काही जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी निवडण्याची संधी राज ठाकरे पार पाडत असल्याचा, टोला देखील पवारांनी लगावला आहे.

परदेशी पंतप्रधानाचा मुद्दा संपल्याने काँग्रेसची घरोबा -राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्मितीपासूनच राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण वाढलं, असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला होता. देशाला परदेशी पंतप्रधान चालणार नाही. म्हणून 1999 ला शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले असल्याची आठवण आपल्या भाषणातून करून दिली होती. त्यावर बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, सोनिया गांधी देशाच्या पंतप्रधान व्हाव्यात किंवा होऊ नयेत याबाबत आपण आपले मत त्यावेळी ही जाहीर रित्या व्यक्त केले होते. त्यानंतर सोनिया गांधी यांनी देखील आपल्याला पंतप्रधान होण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले. आपण परदेशी पंतप्रधान बाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्या मुद्याचा वाद राहिलाच नाही. त्यानंतर आपण काँग्रेस सोबत घरोबा केला असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -Sharad Pawar Criticism on Raj Thackeray : प्रबोधनकार ठाकरे हे माझे आदर्श - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details