महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar : धमकीचा फोन खरेच आला होता का, शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती - Threatening Call

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना धमकीचा फोन आल्या असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र ह्या केवळ अफवा आहेत. कोणत्याही धमकीचा फोन आपल्याला आले नसल्याचे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ( Sharad Pawar Himself Said That He Has Not Received Any Threatening Call )

Sharad Pawar
शरद पवार

By

Published : Sep 19, 2022, 5:09 PM IST

Updated : Sep 19, 2022, 5:40 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना धमकीचा फोन आल्या असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र ही केवळ अफवा आहेत. कोणत्याही धमकीचा फोन आपल्याला आले नसल्याचे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले असल्यास आता समोर येत आहे. शरद पवार सोलापूर येथील कुर्डूवाडी या परिसरात दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यावर शरद पवार यांनी येऊ नये अशा प्रकारचा धमकीचा फोन शरद पवार यांना सकाळी करण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र अशा धमकीचा फोन आपल्याला आला नाही. तसेच धमकीच्या सुरू असलेल्या चर्चा बाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दौऱ्यादरम्यान सांगितल आहे. ( Sharad Pawar Himself Said That He Has Not Received Any Threatening Call )


शरद पवार पत्रकार परिषद -शरद पवार आज सोलापूरच्या कुर्डूवाडी येथे दौऱ्यावर ( Sharad Pawar on Kurduwadi visit ) असू त्यांनी पत्रकार परिषदेही घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्यांमधील अनेक मुद्द्यांना हात घातला. सध्या दसरा मेळावा नेमका कोणाचा होणार याबाबत चर्चा सुरू असताना मुंबईतील शिवाजी पार्क आणि शिवसेना हे समीकरण आहे. त्यामुळे दसरा मेळावा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना परवानगी मिळाली पाहिजे अशा प्रकारचे मत आहे या दौऱ्या दरम्यान पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी व्यक्त केले.

Last Updated : Sep 19, 2022, 5:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details