महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2021, 11:59 AM IST

Updated : Nov 25, 2021, 2:30 PM IST

ETV Bharat / city

Shakti Mill Gang Rape Case : अपील केलेल्या आरोपींना दिलासा; फाशीची शिक्षा रद्द

शक्ती मिल प्रकरणातील फाशीच्या शिक्षेविरोधात अपील केलेल्या आरोपींना दिलासा मिळाला आहे. आरोपींना फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2013 मध्ये शक्ती मिल येथे महिलेवरील बलात्कार प्रकरणी ही सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली.

Mumbai High Court
मुंबई उच्च न्यायालय

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay high court) या प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द केली आहे. या तिन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आज शक्ती मिल बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high court) निकाल दिला असून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 5 पैकी 3 आरोपींची फाशी रद्द करण्यात आली आहे. न्यायालयाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं आहे.

अंतिम निकाल केला जाहीर

आरोपींची शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवर नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव (Justice sadhana jadhav) आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण (Justice prithiraj chavan) यांच्या खंडपीठापुढे पार पडली. सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर या खंडपीठानं निकाल राखून ठेवला होता. आज या खंडपीठानं राखून ठेवलेला अंतिम निकार जाहीर केला.

फाशी टळली
शक्तीमिल बलात्कार प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. यात विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. यातील सिराज खानला मुंबई सत्र न्यायालयाने आधीच जन्मठेप दिली होती. अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठण्यात आले होते. तर उर्वरीत विजय जाधव, सलीम अन्सारी आणि कासिम बंगाली यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते. या तिघांनाही आज हायकोर्टाने फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

काय प्रकरण आहे
22 ऑगस्ट 2013 रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागातील शक्ती मिल परिसरात (Shakti Mill Gang Rape Case) संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित महिला आप्लया सहकाऱ्यासोबत कामानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी तेथे गेली होती. त्यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. विशेष म्हणजे अन्य एका 19 वर्षीय तरुणीनेही शक्ती मिल परिसरातच आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील आरोपीदेखील तेच होते. मुंबई सत्र न्यायालयाने यातील आरोपी विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला शिक्षा सुनावली होती. सिराज खानला जन्मठेप तर इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.

हेही वाचा -Shakti Mill Gang Rape Case : काय आहे शक्ती मिल प्रकरण ?

Last Updated : Nov 25, 2021, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details