मुंबई :अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड (Umesh Kolhe Murder Case Update) प्रकरणातील फरार आरोपी कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्याकरिता येत असताना कोट परिसरातून आरोपीला एनआयएने अटक केली (NIA arrested Kolhe murder accused) होती. या आरोपीची आज एनआयए कोठडी संपल्यामुळे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला पुन्हा 6 ऑक्टोबर पर्यंत एनआयए कोठडी (Shahim Ahmed NIA Custody) रवानगी केली आहे. Amravati Crime
Umesh Kolhe Murder Case Update: उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी शहिम अहमदला पुन्हा 6 ऑक्टोबर पर्यंत एनआयए कोठडी - Shahim Ahmed NIA custody
अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड (Umesh Kolhe Murder Case Update) प्रकरणातील फरार आरोपी कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्याकरिता येत असताना कोट परिसरातून आरोपीला एनआयएने अटक केली (NIA arrested Kolhe murder accused) होती. या आरोपीची आज एनआयए कोठडी संपल्यामुळे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला पुन्हा 6 ऑक्टोबर पर्यंत एनआयए कोठडी (Shahim Ahmed NIA Custody) रवानगी केली आहे. Amravati Crime
एनआयएच्या वकीलाचा युक्तिवाद-एनआयएच्या वतीने आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, आरोपी अहमद याच्या जवळ या प्रकरणात वापरण्यात आलेले हत्यार आणि ज्या वाहनांचा उपयोग करण्यात आला होता. ते वाहन जप्त करण्याकरिता कोठडीची आवश्यकता आहे. त्यामुळे कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात आणखी दोन आरोपी संशयित आहे ज्याचा तपास देखील सदर आरोपीकडून करणे आवश्यक आहे असा युक्तिवाद एनआयएच्या वतीने वकील संदीप सदावर्ते यांनी केला आहे.
4 ऑक्टोबर रोजी अर्जावर सुनावणी -या प्रकरणात आरोपीच्या वतीने वकील अली काशीफ खान देशमुख यांनी असा एक वाद केला की, आरोपी स्वतःहून न्यायालयासमोर स्वतःला आत्मसमर्पण करण्याकरिता आला होता. मात्र एनआयएने आरोपीला कोर्ट परिसरामध्ये न्यायालयीन कामकाजाचे डॉक्युमेंट तयार करत असताना अटक केली आहे ही अटक कलम 279 अंतर्गत बेकायदेशीर असल्याचे युक्तिवाद आरोपीच्या वतीने आली काशीफ खान देशमुख यांनी केला होता. या संदर्भातील अर्ज न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता. या अर्जावर एनआयएला उत्तर सादर करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले होते. या अर्जावर एनआयएने उत्तर दाखल केले असून 4 ऑक्टोबर रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे.
आरोपींची लिंक ही आंतरराष्ट्रीय टेररिझम सोबत -उमेश कोल्हे हत्याकांडामध्ये एनआयएला उद्या तपासाला 180 दिवस पूर्ण होत असल्याने त्यांना आरोप पत्र दाखल करणे अवश्यक होते. मात्र एनआयएने सोमवारी सत्र न्यायालयात अर्ज करून या प्रकरणात आणखी 180 दिवस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे. एनआयए असा युक्तिवाद केला की, या प्रकरणांमध्ये आरोपींकडून कुठल्याही प्रकारचे तपासात सहकार्य मिळत नाही आहे. तसेच आरोपींची लिंक ही आंतरराष्ट्रीय टेररिझम सोबत असल्याचे देखील पुरावे मिळाले आहे, असा दावा एनआयए केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी तपास करणे बाकी असल्याने मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे आहेत अटकेतील आरोपी-एनआयए कडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.