मुंबई- जागतिक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरातील झरे आटल्याचा मुद्दा आज पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. त्यामुळे सदस्य आक्रमक झाले. या प्रश्नाला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान सचिवांना लोणारला जाऊन बैठक घेण्याचे सुचवून झरे आटले नसल्याचा खुलासा केला. हा जीएसडीचा अहवाल आहे. वन्यप्राण्यासाठी ६ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यासह नगरपालिका पाणी पुरवत असल्याचेही ते म्हणाले.
पावसाळी अधिवेशन; लोणार सरोवरातील पाण्याचे झरे आटल्यावरुन तापले राजकारण, मुनगंटीवार म्हणाले. . . . - वनविभाग
लोणार सरोवरातील पाण्याचे झरे आटल्याचा मुद्दा आज अधिवेशनात चांगलाच गाजला. त्यावरुन सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले.
आज सकाळीच विधानसभेत लोणारच्या मुद्यावरुन आमदार आक्रमक झाले. त्यानंतर त्यावनविभागाच्या लक्षवेधीवरुन सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले. लक्षवेधी राखून ठेवण्यावर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले. त्यावर पर्यटन आणि वनविभागाशी संयुक्त चर्चा करण्यात येणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
केंद्रात 'सफाई' सुरू झाली, आता राज्यातही करणार - मुनगंटीवार
केंद्र सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांची सफाई सुरू केली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची सफाई करण्यात येईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांना घरी पाठवण्यात येईल असेही ते म्हणाले. अशा अधिकाऱ्यांची पेन्शनही बंद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.