26/11 Terrorist Attacks : मुंबई हल्ल्यासंदर्भात परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप - Shamsher Pathan
26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप परमबीर यांच्यावर शमशेर पठाण यांनी केला. शमशेर पठाण हे मुंबईचे निवृत्त पोलीस एसीपी आहेत. त्यांनी जुलै महिन्यात राज्याचे गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिलं होतं. या गंभीर आरोपामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. माजी पोलीस अधिकारी शमशेर पठाण (Shamsher Pathan) यांनी परमबीर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील (26/11 Terrorist Attacks) दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप परमबीर यांच्यावर शमशेर पठाण यांनी केला. शमशेर पठाण हे मुंबईचे निवृत्त पोलीस एसीपी आहेत. त्यांनी जुलै महिन्यात राज्याचे गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिलं होतं. या गंभीर आरोपामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.