मुंबई- अमेरिकन फार्मा मेजर मॉडर्ना यांनी त्यांची कोविड लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याची घोषणा आज (मंगळवारी) सकाळी केली आहे. या घोषणेनंतर जागतिक बाजारपेठेच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय इक्विटी निर्देशांकांनी नवीन विक्रम गाठला आहे.
सेन्सेक्स ४४ हजारांचा आकडा ओलांडत ४४ हजार १६१.१६ वर पोहोचला. सकाळी साडेनऊ वाजता सेन्सेक्स ४३,९५१.७६ वर होता. त्यापेक्षा ३१३.७८ टक्क्यांनी वाढून तो ४३,६३७.९८ वर बंद झाला.
दर दुसरीकडे निफ्टी १२,८५४.२५वर ट्रेंडींग होता. त्यानंतर ७४ अंकांनी वधारला. निफ्टी आतापर्यंतच्या सर्वाधिक १२,९३४.०५ अंकांवर पोहोचला आहे.
हेही वाचा -घाऊक बाजारपेठेत गेल्या आठ महिन्यातील उच्चांक; ऑक्टोबर १.४८ टक्क्यांची नोंद
हेही वाचा -ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या आयातीत गतवर्षाच्या तुलनेत 36 टक्क्यांनी वाढ
घाऊक बाजारपेठेत गेल्या आठ महिन्यातील उच्चांक -
घाऊक बाजारपेठेतील महागाईने गेल्या आठ महिन्यातील उच्चांक गाठला आहे. ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारपेठेत १.४८ टक्के महागाईची नोंद आहे. कारखान्यातील उत्पादनांची किंमत वाढल्याने घाऊक बाजारपेठेत महागाई वाढली आहे. सप्टेंबरमध्ये घाऊक बाजारपेठेत १.३२ टक्के महागाईची नोंद होती. घाऊक बाजारपेठेत महागाई फेब्रुवारीत २.२६ टक्के होती. त्यानंतर आठ महिन्यांनी पहिल्यांदाच घाऊक बाजारपेठेत महागाईने उच्चांक गाठला आहे. ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारपेठेत अन्नाच्या वर्गवारीत उत्पादनांच्या किंमती कमी झाल्या आहेत. तर उत्पादनांच्या किमती वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.