महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोमवारपासून सुरू होणार राज्यातील शाळा - वर्षा गायकवाड - Schools in the state will start from Monday

राज्यातील शाळा येत्या २४ जानेवारी सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्यातील शाळा
राज्यातील शाळा

By

Published : Jan 20, 2022, 1:40 PM IST

Updated : Jan 20, 2022, 2:49 PM IST

मुंबई - राज्यातील शाळा येत्या २४ जानेवारी सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मुंबईत त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

सोमवारपासून सुरू होणार राज्यातील शाळा - वर्षा गायकवाड

24 जानेवारी पासून शाळा सुरू
करोनाची तिसरी लाट येणार असल्याने व करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील शाळा पुन्हा १५ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता ही लाट ओसरत असून स्थानिक प्रशासनाला याची जबादारी देत राज्यातील शाळा २४ जानेवारी पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्राथमिक शाळा सुद्धा 24 जानेवारीपासून सुरू
महत्वाचे म्हणजे राज्यातील प्राथमिक शाळासुद्धा सोमवारपासून सुरु होणार आहेत. करोनाची तिसरी लाट येणार असल्याने राज्यातील शाळा पुन्हा १५ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता ही लाट ओसरत असून स्थानिक प्रशासनाला याची जबादारी देत राज्यातील शाळा २४ जानेवारी पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतला सकारात्मक निर्णय
वर्षा गायकवाड यांनी सांगितले की शाळा सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक घेऊन एकंदरीत फाईल काल मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवली होती. त्यामध्ये शाळा सोमवारी सुरू करा अशी आम्ही विनंती केली होती. ती विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. येत्या सोमवारपासून संपूर्ण राज्यात प्राथमिक वर्गासह शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासनाला अधिकार
ज्या ठिकाणी रुग्ण संख्या कमी आहे त्याठिकाणी नियमांचे पालन करून शाळा सुरू होतील. जिथे रुग्ण संख्या जास्त असेल तिथे स्थानिक प्रशासनाला आम्ही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. काळजी घेऊनच शाळा सुरू कराव्या अशी मी विनंती करत आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आमच्या नियमावलीत दोन गोष्टी टाकत आहोत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत. तसेच शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत. त्याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेतच करावे अशी सुद्धा आमची मागणी आहे.

Last Updated : Jan 20, 2022, 2:49 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

January 24

ABOUT THE AUTHOR

...view details