महाराष्ट्र

maharashtra

खास मुलाखत : राज्यातील परिस्थिती पाहूनच दहावी-बारावीच्या परीक्षेचा निर्णय - वर्षा गायकवाड

By

Published : Dec 10, 2020, 7:41 PM IST

राज्यात मागील काही दिवसांपासून नववी ते बारावीच्या वर्गांना प्रत्यक्षात सुरूवात झाली असून त्याला मुंबई, पुणे आदी काही शहरांचा अपवाद वगळता पालक आणि विद्यार्थ्यांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या. पूर्व प्राथमिक ते आठवीपर्यंच्या शाळा या नवीन वर्षांत प्रत्यक्षात सुरू करण्याचा कोणताही निर्णय तुर्तास झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मुलाखत न्यूज
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मुलाखत न्यूज

मुंबई -राज्यातील कोरोना आणि त्याची एकूणच परिस्थिती पाहून दहावी आणि बारावीच्या अंतिम लेखी परीक्षेचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

खास मुलाखत : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
राज्यात मागील काही दिवसांपासून नववी ते बारावीच्या वर्गांना प्रत्यक्षात सुरूवात झाली असून त्याला मुंबई, पुणे आदी काही शहरांचा अपवाद वगळता पालक आणि विद्यार्थ्यांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, आज शालेय शिक्षण विभागाने जुन्या पेन्शन योजनेसाठीचा असलेला अध्यादेश रद्द करण्याचा ऐतिहास‍िक निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यात २००५ नंतर रूजू झालेल्या लाखो शिक्षकांना याचा लाभ मिळणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा -'माझ्या उत्तराने ईडीच्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले की नाही, हे माहीत नाही'


आदर्श शाळांच्या संदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या की, यावर आजच आमची एक बैठक झाली असून त्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू आहे. आदर्श शाळांच्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हा अधिकारी, जिल्हापरिषदेसोबत, शिक्षण विभाग स्तरावरील अधिकारी माहिती घेत असून त्यासाठीची कार्यवाही सुरू असून त्याचा आढावा आज घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या नववी ते बारावीच्या शाळा सुरू असून त्याला प्रतिसाद मिळत आहे. मात्र‍ पूर्व प्राथमिक ते आठवीपर्यंच्या शाळा या नवीन वर्षांत प्रत्यक्षात सुरू करण्याचा कोणताही निर्णय तुर्तास झाला नाही. त्यामुळे राज्यात या शाळांमध्ये सध्या सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण हे तुर्तास तरी तसेच सुरू राहील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा -'शेतकरी कायदा रद्द होणार नाही, आंदोलनकर्ते राजकीय पक्षांचे'; रामदास आठवलेंची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details