महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

kangana ranaut controversy वेडे लोक बरळतात, त्यांना नशेचा पुरवठा कोण करतं, याचा शोध NCB ने घ्यावा -संजय राऊत - देवेंद्र फडणवीस

अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) स्वातंत्र्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. . वेडे लोक कोणत्या नशेत बरळत आहे आणि या नशेचा पुरवठा कोण करत आहे, याचा शोध घेतला पाहिजे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी कंगनावर जोरदार टीका केली.

'वेडे लोक बरळतात, त्यांना नशेचा पुरवठा कोण करतं, याचा शोध एनसीबीने घ्यावा'; संजय राऊतांचा कंगनावर घणाघात
Sanjay Raut Takes Jibe at Kangana Ranaut on her controversial statement

By

Published : Nov 17, 2021, 12:04 PM IST

Updated : Nov 17, 2021, 1:23 PM IST

मुंबई -अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) देशाला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक असून खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले. तसेच कंगनाने गांधीजींच्या अहिंसेच्या मंत्राची खिल्ली उडवत, दुसरा गाल पुढे केल्याने (थापड खाल्याने) स्वातंत्र्य "भीक" मिळत नाही, असे म्हटलं. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. वेडे लोक कोणत्या नशेत बरळत आहे आणि या नशेचा पुरवठा कोण करत आहे, याचा शोध घेतला पाहिजे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी कंगनावर जोरदार टीका केली.

; संजय राऊतांचा कंगनावर घणाघात

खासदार राऊत (sanjay raut) म्हणाले, 'वेडे लोक बरळत असतात. ते का बरळतात. ते कोणत्या नशेत असतात. त्यांना या नशेचा पुरवठा कोण करत आहे? याचा तपास एनसीबीने केला पाहिजे.' असे म्हणत संजय राऊत यांनी कंगना रणौत यांच्या महात्मा गांधीवरील पोस्टचा समाचार घेतला. तसेच कंगणाचे नाव न घेता ते म्हणाले, त्या मॅडमने हेही लक्षात घेतले पाहिजे की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच महात्मा गांधींच्या समाधीवर जाऊन फुले वाहतात. महात्मा गांधी हे देशाचेच नाही तर जगाचे नेते होते.

विरोधी पक्षनेते सध्या वैफल्यग्रस्त -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (devendra fadnavis) केलेल्या वक्तव्यावर खासदार राऊत म्हणाले, विरोधक सध्या नैराश्यात आहेत. ते वैफल्यग्रस्त आहेत. नैराश्याचे अजीर्ण झाल्यामुळे ते आता असे बडबडत आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांकडे सध्या मोकळा वेळ भरपूर आहे, त्यामुळे ते जुनी गाणी ऐकत असावेत, असा चिमटाही त्यांनी फडणवीसांना काढला.

नाहीतर द्रेवेंद्रजींना येरवाड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल -

संजय राऊतांबद्दल (sanjay raut) 'काय होतास तू काय झालास तू...' असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर केले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही काय होतो हे आम्हाला माहित आहे. तुम्ही काय होतात हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, आणि जर ही अवस्था अशीच राहिली तर पुण्याच्या येरवाड्याच्या रुग्णालयात दाखल होण्यासारखी त्यांची अवस्था होईल. मात्र तसं काही होऊ नये, अशी प्रार्थना करतो, असेही राऊत म्हणाले.

बाळासाहेब असते तर अनेक गोष्टींना आज ब्रेक लागला असता -

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) हे योध्दा होते. मराठी आणि हिंदुसाठी ते लडव्य महानायक होते. त्यांच्या स्मृती अखंड आमच्या मनात असतात. बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर अनेक गोष्टींना आज ब्रेक लागला असता, त्या कुठल्या गोष्टी हे मी आता सांगत नाही. हिंदू या यापुढे मार खाणार नाही आणि हिंदू पळपूटा नाही हे बाळासाहेबांनी देशाला दाखवून दिलं. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस ताठ मानेने जगू त्यासाठी त्यांनी अखंड संघर्ष केला आणि मराठी माणसाच्या मनगटात चेतना जागवली, असे राऊत म्हणाले.

Last Updated : Nov 17, 2021, 1:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details