महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाकरी तोफ धडाडणार; शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी सायंकाळी पार पडेल

आमची मुलुख मैदान तोफ असते उद्या ती तोफ धडाडणार, महाराष्ट्रातील जे प्रश्न आहेत महाराष्ट्र मधील काही लोकांनी दोन वर्षात त्यांना काही काम धंदा उरला नाही. त्यामुळे ही एक नाटक चळवळ सुरू केलेली आहे, तर त्या नाट्य चळवळीला सुद्धा उद्या चांगलं उत्तर दिले जाईल. संपूर्ण नियम कायदा कोरोना संदर्भात केले आहेत, याचं भान ठेवून हा मेळावा होईल. कोणीतरी टीका करत असेल तरी त्या टीकेला काही अर्थ नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे.

13352695
13352695

By

Published : Oct 14, 2021, 12:32 PM IST

Updated : Oct 14, 2021, 1:07 PM IST

मुंबई- सालाबादा प्रमाणे शिवसेनाचा दसरा मेळावा यंदाही पार पडणार आहे. मात्र त्यावर कोरोना नियमांवलीचे निर्बंध असल्याने विजयादशमीला होणारा दसरा मेळावा शिवतीर्थावर न होता बंदिस्त सभागृहात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

राऊत म्हणाले, शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या(शुक्रवारी) संध्याकाळी शिवतीर्थावर न होता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदिस्त सभागृहात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि शिसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्या नुसार उद्याचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात करण्याचे ठरले आहे. शुक्रवारी सायंकाळी हा मेळावा पार पडणार आहे. दसरा मेळावा हा शक्यतो कधी चुकवला जात नाही, महाराष्ट्राला, देशाला त्याची प्रतीक्षा असते शिवसेना प्रमुख त्या व्यासपीठावरून देशाच्या राज्याच्या कायद्याच्या घडामोडीवर काय भाष्य करतात, असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी सायंकाळी पार पडेल

विरोधकांच्या नाटक कंपनीला उत्तर देणार-

आमची मुलुख मैदान तोफ असते उद्या ती तोफ धडाडणार, महाराष्ट्रातील जे प्रश्न आहेत महाराष्ट्र मधील काही लोकांनी दोन वर्षात त्यांना काही काम धंदा उरला नाही. त्यामुळे ही एक नाटक चळवळ सुरू केलेली आहे, तर त्या नाट्य चळवळीला सुद्धा उद्या चांगलं उत्तर दिले जाईल. संपूर्ण नियम कायदा कोरोना संदर्भात केले आहेत, याचं भान ठेवून हा मेळावा होईल. कोणीतरी टीका करत असेल तरी त्या टीकेला काही अर्थ नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. तसेच या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री या देशाच्या राजकारणाविषयी, महाराष्ट्राचा राजकारणाविषयी विकासाविषयी अशा अनेक प्रश्नावर भाष्य केले जाईल याची खात्री बाळगा, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे-

डिझेलचा राक्षस तो आता 2024 ला जाळायचा आहे, त्याची सुरुवात उद्याच्या रावण दहनापासून करणार आहोत. चंद्रकांत दादा बोलतात त्यांना बोलत राहू द्या, त्याने महाराष्ट्राला काही फरक पडतो असं वाटत नाही त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, ती रोज बोलतात आमच्या राज्यातल्या ज्या महिला नेते आहेत, ते त्या संदर्भात काम करतात. सरकार काम करते, कायदा काम करतोय सगळ्यांना माहिती आहे. विरोधी पक्षांना काम आहेत तोंडाच्या तोंडाच्या वाफा दवडत आहेत त्यांना दवडू द्या, मात्र आरोप करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना कोणी किंमत देत नसल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.

हेही वाचा - माझ्या जावायाला 'एनसीबी'ने फसवले; नवाब मलिकांचा पत्रकार परिषदेत आरोप

Last Updated : Oct 14, 2021, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details