मुंबई -बाबरी मशीद ( Babri Demolition ) कोणी पाडली, यावरून महाराष्ट्रात राजकारण रंगले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis On Babri Demolition ) यांनी बाबरी मशीद पडल्याप्रकरणी शिक्षा भोगल्याचा दावा केला. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut Replied To Devendra Fadnavis ) यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी ( BJP Leader Lalkrushna Adwani ) यांचा जुना व्हिडीओ ट्विटरवरून पोस्ट करत फडणवीसांच्या दाव्याची हवा काढली आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांचे ट्विटरवरून जोरदार प्रत्युत्तर -भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबरी मशीद तोडण्यासाठी मराठी लोकांचा पुढाकार होता. ते पोलिसांना सुद्धा ऐकत नव्हते, असे विधान केले आहे. यावरून बाबरी मशीद कोणी पाडली, हे ऐकावे, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांना काढला आहे.