मुंबई : "मराठी माणसाने व्यापार करणे हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, तर हा मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय रोवून उभा राहील" अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ते प्रताप सरनाईक यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलत होते. आम्ही चौकशांना घाबरत नाही, मात्र आता तुम्ही चौकशांना घाबरायला हवं, कारण आता मी एकशे वीस नेत्यांची यादी अर्थमंत्रालयाला पाठवणार आहे. त्यानंतर ईडी कोणावर कारवाई करते ते पाहूच, असे राऊत म्हणाले.
मी अर्थमंत्रालयाला १०० नेत्यांची यादी पाठवतो; मग बघू कारवाई होते का - संजय राऊत तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय देऊन उभा राहील..
मराठी माणसानं उद्योग करणे हे जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल, तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
मला नोटीस आली तरी आश्चर्य वाटणार नाही..
मला अनेकांनी विचारलं तुम्हाला ईडीची नोटीस आली का? खरंतर मीही त्याची वाट पाहतोय, आणि मला किंवा अजित पवार यांना नोटीस आली तर मला धक्का बसणार नाही. असे राऊत म्हणाले. देशात इतर काही काम नाही आहे. घोटाळा करुन लोक देशाबाहेर पळत आहेत. एका वर्षात लोकांची संपत्ती दुपटीने वाढत आहे, त्यांची ईडी चौकशी करणार नाही. पण महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
१२० नेत्यांची यादी..
माझ्याकडेही काही नावं आहेत. सध्या यांची सुरू असलेली सर्व कारवाई पूर्ण झाल्यावर मी सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी अर्थमंत्रालयाकडे सोपवणार आहे. त्यानंतर ईडी कोणाकोणावर कारवाई करते ते आपण पाहूच, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा :पटेलांच्या रुपाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला; मुख्यमंत्र्यांसह इतरांनी वाहिली श्रद्धांजली..