महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'खलनायकही ताकदीचा लागतो! पुढील साडेतीन वर्ष विरोधकांनी अशीच भूमिका साकारावी'

मुनगंटीवार चांगला विनोद करतात. येत्या काही दिवसात राज्यात थेटर सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही थेटर चालकांची आम्हाला सूट हवी आहे, अशी मागणी केली. मात्र, त्यांना आता सूट देण्याची गरज वाटत नाही. त्यांनी केवळ सुधीर भाऊंच्या विनोदाचे कार्यक्रम ठेवावे चांगली गर्दी होईल, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी मुनगंटीवार यांना लगावला यावेळी लगावला.

sanjay raut
शिवसेना खासदार संजय राऊत

By

Published : Mar 11, 2021, 12:07 PM IST

मुंबई- महाविकास आघाडी सरकार पुढील साडेतीन वर्ष सुरळीतपणे महाराष्ट्राची सत्ता हाकेल. त्यामुळे आता विरोधी पक्षाने तारखा देणे बंद केले पाहिजे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने उत्तम कामगिरी केली आहे. अशीच कामगिरी पुढचे साडेतीन वर्ष त्यांनी करायला हवी, असा उपरोधिक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे.

सरकार तीन महिन्यात पडेल असे भाकित सुधीर मुनंगटीवार यांनी केले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुनगंटीवार चांगला विनोद करतात. येत्या काही दिवसात राज्यात थेटर सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही थेटर चालकांची आम्हाला सूट हवी आहे, अशी मागणी केली. मात्र, त्यांना आता सूट देण्याची गरज वाटत नाही. त्यांनी केवळ सुधीर भाऊंच्या विनोदाचे कार्यक्रम ठेवावे चांगली गर्दी होईल, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शिवसेना खासदार संजय राऊत

खलनायकाची भूमिकाही महत्वाची-

कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकासआघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. जर यांनी आपल्या भूमीचा चांगल्या वठवल्या तर पुढची साडे तीन वर्षे खेळी मेळीचे वातावरण राहील, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

फडणवीस यांनी सामनातून अग्रलेख आला म्हणजे घाव वर्मी लागला असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, सामना वाचतात ते, आज त्यांनी कबूल केले. सामना वाचने ही एक सुंदर सवय आहे. त्यात सत्य मांडण्यात येते. देवेंद्र फडणवीस यांना ही सवय लागली असेल तर मी त्यांचे कौतुक करतो.

कारवाई अशीच होते-

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी विरोधक आक्रमक झाला होता. त्यानंतर वझेंची बदली करण्यात आली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सभागृहात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सचिन वझे पदावरून दूर झाले आहेत. कारवाई अशीच होते, फडणवीस मुख्यमंत्री असताना अशीच कारवाई करायचे, असा टोलाही त्यांनी फडवीसांना लगावला. तसेच आधी फाशी आणि मग चौकशी हे आपल्या कायद्यात लिहिले नाही. शंभर अपराधी सुटले तरी चालतील एक निरपराध फासावर जाता काम नये, असे म्हणत त्यांनी सचिन वझे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई बाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

महाविकासा आघाडीमध्ये काँग्रेस सगळ्यात जास्त खुश -

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला डावलले जात असून काँग्रेस नाराज असल्याबाबत विचारणा केली असता, राऊत म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सगळ्यात जास्त खुश असलेला पक्ष आहे. यासाठी तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलांना विचारा. ते प्रदेशाध्यक्ष झाले, ते खूप खुश आहेत. त्यांचे सभागृहातील भाषण ऐका असेही राऊत यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details