मुंबई -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची अहमदाबाद इथे गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत काय गुढ आहे ? ते भेटले की नाही. हे माहिती नाही. मात्र, अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत काय सस्पेन्स आहे ? शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेट झाली की नाही याची माहिती नाही. जर झाली आहे. तर त्याच चुकीचे काय आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर चुकीचं काहीच नाही, असं संजय राऊत म्हणाले.
गृह मंत्री आमित शाह यांनी काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, असे म्हटलं. जर त्या दोघांनी भेट घेतली. तर काहीच चुकीचे नाही. तसेच राजकारणात कुठल्याच बैठकी गुप्त नसतात. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. मात्र नंतर त्या सार्वजिनिक होतात, जसं की बंद खोलीतील चर्चा असते, असेही ते म्हणाले.
महाविकासआघाडी पूर्ण ताकदीने काम करणार -