मुंबई - एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, क्रांती रेडकरशी आमचा काही संबंध नाही. ही लढाई एनसीपी आणि एनसीबी आणि इतर अशी सुरु आहे. क्रांती रेडकरवर व्यक्तिगत टीका केलेली नाही. महाराष्ट्रातून ईडी, सीबीआय एनसीबी, आयपीएस अधिकारी हे बाहेरचे अधिकारी इथे येऊन त्रास देतात. ज्याप्रकारे दिल्लीतून आक्रमण सुरू आहे, ज्यांच्या मानगुटीवर कारण नसताना बसण्याचा प्रयत्न होतोय, खोटे गुन्हे दाखल केले जातात ते सगळे मराठी आहे. देगलूरमध्ये देखील धाडी पडल्यात अशोकराव मराठी नाहीत का?, पवार यांचे नातेवाईक मराठी नाहीत का? सगळेच मराठी आहेत, असे राऊत म्हणाले.
क्रांती रेडकर मराठी मुलगी, तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे - संजय राऊत
क्रांती रेडकर यांच्या विषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. साहेब जरी नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना हे बाळासाहेबांच्या विचारांचे आहे, ठाकरे सरकार आहे,पवार साहेब आहेत सगळं व्यवस्थित आहे. कोणावर अन्याय होणार नाही. गुन्हा महाराष्ट्रात घडलाय त्याविषयी मी फार बोलनार नाही कारण तो सरकारचा विषय आहे.
संजय राऊत
प्रश्न सत्य-असत्य लढायईचा आहे -
क्रांती रेडकर यांच्या विषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. बाळासाहेब जरी नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना हे बाळासाहेबांच्या विचारांचे आहे, ठाकरे सरकार आहे, पवार साहेब आहेत सगळं व्यवस्थित आहे. कोणावर अन्याय होणार नाही. गुन्हा महाराष्ट्रात घडलाय त्याविषयी मी फार बोलणार नाही कारण तो सरकारचा विषय आहे.
Last Updated : Oct 29, 2021, 11:39 AM IST
TAGGED:
Sanjay Raut on Kranti Redkar