मुंबई -शिवसेना आपली असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला ( Sanjay Raut on EC ) पत्र दिला आहे. या पत्राची दखल घेत दोन्ही पक्षाला 8 ऑगस्ट पर्यंत कागदपत्रांसहित पुरावे सादर करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Sanjay Raut on Shinde group Shiv Sena claim ) दिले आहेत. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on shiv sena claim ) हे चांगले संतापले असून, शिवसेना कोणाची यासाठी आमच्याकडेच कसली पुरावे मागत आहात? आज पर्यंत महाराष्ट्रासाठी हजारो शिवसैनिक शहीद झाले. ही वेळ बंडखोरीमुळे आली असून राज्यातील अकरा कोटी जनता हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. जे शिवसेना मधून फुटले आहेत त्यांनी त्यांचा वेगळा पक्ष स्थापन करावा त्याचे आनंदात राहावे असा टोला एकनाथ शिंदे गटाला संजय राऊत यांनी आज आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून लगावला आहे.
शिवसेना कोणाची? हे राज्यातील अकरा कोटी जनतेला माहीत आहे. 1992 च्या दंगलीमध्ये शिवसैनिकांवर अनेक गुन्हे दाखल झाले. सीमा प्रश्नासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरला. शिवसेनेतून केवळ दहा ते वीस लोक फोडली म्हणून शिवसेना फुटली असे होत नाही. या सर्वांच्या मागे भारतीय जनता पक्ष आहे. महाराष्ट्र द्वेषींनी महाराष्ट्रावर ही वेळ आणली आहे. शिवसेनेतील लोकांचा वापर केला जातो हे दुर्दैवी आहे. मात्र, जी लोक आज सत्तेच्या घोड्यावर बसले आहेत. त्यांची गाढवावरून जनता धिंड काढेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
लोकसभा अध्यक्षांकडून बंडखोरांना तात्काळ उत्तर -शिवसेना गटप्रमुख विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहिले होते. या पत्राच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना लोकसभा अध्यक्षांनी उत्तर दिले नाही, मात्र बंडखोर खासदारांनी अध्यक्षांना गटनेते बद्दल लिहिलेल्या पत्राला 24 तासांच्या आत उत्तर देण्यात आले. अशाप्रकारे सत्याचा खून होत असेल तर आमच्याकडे पुरावे मागितले जात आहे असा टोलाही लोकसभा अध्यक्षांना संजय राऊत यांनी लगावला.