महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut on Devendra Fadnavis : हे लेच्या पेच्यांचे राज्य नाही - संजय राऊत - देवेंद्र फडणवीस रॅली मुंबई संजय राऊत प्रतिक्रिया

बाबरी पडली तेव्हा शिवसेना ( Sanjay Raut on Babri Masjid ) कुठे होती? देवेंद्र फडणवीस ( Sanjay Raut on Devendra Fadnavis rally Mumbai ) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut News Mumbai ) यांनी सडेतोड उत्तर देत राज ठाकरे यांच्या भोंग्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे? मुंबईत आपल्या निवासस्थानी ते बोलत होते.

Sanjay Raut on Devendra Fadnavis
बाबरी मस्जिद संजय राऊत प्रतिक्रिया

By

Published : May 2, 2022, 12:45 PM IST

Updated : May 2, 2022, 2:18 PM IST

मुंबई -बाबरी पडली तेव्हा शिवसेना ( Sanjay Raut on Babri Masjid ) कुठे होती? देवेंद्र फडणवीस ( Sanjay Raut on Devendra Fadnavis rally Mumbai ) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut News Mumbai ) यांनी सडेतोड उत्तर देत राज ठाकरे यांच्या भोंग्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे? मुंबईत आपल्या निवासस्थानी ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत

हेही वाचा -Police notice to MNS party workers : महाआरती अगोदरच मनसे कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस

बाबरीबाबत इतिहास तपासा -किती बाबरी ढाच्यावर बोलणार? महागाई, बेरोजगारी चीन घुसखोरी, असंख्य प्रश्न आहेत यावरून लक्ष हटवण्यासाठी हनुमान चालीसा, बाबरी यावर भाजप, त्यांचे सिस्टर पक्ष लक्ष वेधत आहेत. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती, हे भाजपने तेव्हाचे त्यांच्याच पक्षाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारा. त्या काळातला सीबीआयचा अहवाल तपासा. राम मंदिर उभे राहतय. वातावरण बद्दललय. प्रश्न बद्दललेत, पण भाजप आणि त्यांचे गुप्त छुपे साथीदार या प्रश्नांकडे लोकांना आकर्षित करत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणीस यांना लगावला.

सामनामध्ये शरद पवार यांची मुलाखत घेणार - शरद पवार यांच्याविषयी ते काय बोलले मला माहिती नाही. मी लवकरच सामनामध्ये त्यांची मुलाखत घेणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. आता वातावरण बदललेल आहे, प्रश्न बदललेले आहेत. हा विषय का काढत आहेत. भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या प्रश्नावर बोला. महागाई बेरोजगारी बाबत भाजपचा मौन का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

सध्या भोंगे हा विषय नाही आहे. त्यापेक्षा अतिशय महत्त्वाचे विषय देशांमध्ये आहेत. भोंग्यासाठी इलेक्ट्रिसिटी कोणाची आहे. पावर कोणाची आहे, हे देशाला माहीत आहे. हा कायद्याच्या चौकटीतला विषय आहे. त्यावर कारवाई होऊ शकते. सर्वोच्च न्यायालय काय म्हणते, उच्च न्यायालय काय म्हणते, पोलीस व्यवस्था काय म्हणते हे बघून कारवाई होईल. सध्या तुम्हाला तर काहीच काम नाही म्हणून हे सर्व बोलून महाराष्ट्राचे, देशाचे वातावरण खराब करत आहात. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे होत आहे, हे राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

हे लेच्चा पेच्चांचे राज्य नाही! - भोंग्याविषयी बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही विचारवंत आहोत. त्यामुळे, लोकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही लढाई केली आहे. आंदोलने केली आहेत. प्रत्येकाने कायद्याचे पालन करायला पाहिजे. हे लेच्या पेच्यांचे राज्य नाही आहे. इथे गृहमंत्री आहेत. सरकार आहे. सरकारला माहित आहे काय करायचे आहे. काल मुंबईतील सभेत हे रावणाचे राज्य आहे का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, हे रावणाचे राज्य आहे का? ज्यांनी हे वक्तव्य केले आहे त्यांनी इतिहास बघितला पाहिजे. रावणाचा अंत अहंकाराने झाला. तो हुषार, विद्वान होता. तो धारातीर्थ पडला तो त्याच्या अहंकारामुळे. काही लोकांना सत्ता गेल्यामुळे अहंकार येतो. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो. पण, काही लोकांना सत्ता गमावल्यानंतर जो अहंकार येतो तो विरोधी पक्षाच्या अंगात संचारला आहे. त्यांनी हा अहंकार अगोदर बाहेर काढावा नंतर महाराष्ट्राच्या, देशाच्या प्रश्नावर बोलावे, असा सूचक सल्लाही संजय राऊत यांनी देवेंद्र फडवणीस यांना दिला.

हेही वाचा -ED opposes Nawab Malik bail : नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला ईडीचा विरोध

Last Updated : May 2, 2022, 2:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details