महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

समीर वानखेडेंच्या कागदपत्रांची पडताळणी करणार अनुसूचित जाती आयोग - समीर वानखेडे अनुसूचित जाती आयोगासमोर देणार स्पष्टीकरण

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे दिल्लीत अनुसूचित जाती आयोगासमोर कागदपत्रे सादर केली. वानखेडेंनी सादर केलेल्या कागदपत्रांची महाराष्ट्र सरकारसोबत पडताळणी केली जाईल असे आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांनी माध्यमांना सांगितले आहे.

समीर वानखेडे दिल्लीला रवाना; अनुसूचित जाती आयोगासमोर देणार स्पष्टीकरण
समीर वानखेडे दिल्लीला रवाना; अनुसूचित जाती आयोगासमोर देणार स्पष्टीकरण

By

Published : Nov 1, 2021, 11:48 AM IST

Updated : Nov 1, 2021, 6:00 PM IST

नवी दिल्ली : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे दिल्लीत अनुसूचित जाती आयोगासमोर कागदपत्रे सादर केली. वानखेडेंनी सादर केलेल्या कागदपत्रांची महाराष्ट्र सरकारसोबत पडताळणी केली जाईल असे आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांनी माध्यमांना सांगितले आहे.

वानखेडेंच्या कागदपत्रांची पडताळणी करू

समीर वानखेडेंनी सादर केलेल्या कागदपत्रांची महाराष्ट्र सरकारच्या सोबतीने पडताळणी केली जाईल. जर कागदपत्रे वैध असल्याचे दिसून आले तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला म्हणाले. तर वानखेडेंनी त्यांची बाजू आयोगासमोर मांडली असे आयोगाचे सदस्य सुभाष पारधी म्हणाले. आम्ही त्यांची कागदपत्रे पडताळून बघू असेही ते म्हणाले. वानखेडे यांनी आपला छळ केला जात असल्याचा तसेच खोट्या प्रकरणात अडकविण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केल्याचेही विजय सांपला यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून म्हटले आहे.

मी कागदपत्रे सादर केली-वानखेडे

आयोगाने मागितलेली कागदपत्रे मी सादर केली आहेत. माझ्या तक्रारीची पडताळणी करून आयोगाकडून त्यावर कारवाई केली जाईल असे समीर वानखेडे नंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले. समीर वानखेडे सोमवारी दिल्लीत अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांना भेटले. दरम्यान, अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरूण हलदर यांनी रविवारीच वानखेडेंच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

हलदर यांची वानखेडेंच्या घरी भेट

दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी रविवारी समीर वानखेडे यांच्या निवासस्थानी भेट दिली, यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा झाली. तसेच हलदर यांच्यासमोर यावेळी वानखेडे कुटुंबियांनी आपली बाजूही मांडली.

क्रांती रेडकर म्हणाल्या -

वानखेडे कुटुंबियांनी जात प्रमाणपत्रावरुन झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील सांगताना समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाल्या, "या प्रकरणाशी संबंधित काही मूळ कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी हलदर आमच्या घरी आले होते. आता आमच्यावर आरोप करणाऱ्यांची चौकशी केली जाईल."

Last Updated : Nov 1, 2021, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details