महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sameer Wankhede Case Hearing : समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रबाबतच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर - मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे प्रकरण

समीर वानखेडे यांच्या जात पडताळणी समिती ( Caste Verification Committee Petition ) समोरील तक्रारीवर सुनावणी उद्या 18 जानेवारी रोजी होणार होती. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे समिती अधिकाऱ्यांकडून सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.

समीर वानखेडे संग्रहित फोटो
समीर वानखेडे संग्रहित फोटो

By

Published : Jan 17, 2022, 5:08 PM IST

मुंबई -एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे ( Former Divisional Director of NCB Sameer Wankhede ) यांच्या विरोधातील जात पडताळणी समिती ( Caste Verification Committee Petition ) समोरील तक्रारीवर सुनावणी उद्या 18 जानेवारी रोजी होणार होती. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे समिती अधिकाऱ्यांकडून सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. समीर वानखेडे हे मागील काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहिले आहेत. दरम्यान जात प्रमाणपत्रावरून सुद्धा समीरवर वानखेडे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

समीर वानखेडे यांची मुंबई पाठोपाठ अकोला आणि वाशिम जिल्ह्यातही जात पडताळणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई जिल्हा जात पडताळणी कार्यालयात 18 जानेवारी रोजी होणारी सुनावणी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडली आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी जात पडताळणी समितीकडे याप्रकरणाची तक्रार केल्यानंतर समितीने या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

वाशिम आणि अकोला जिल्हा जात पडताळणी समितीने देखील अशाच प्रकारची माहिती दिली आहे. या दोन्ही कार्यालयांमध्ये समीर ज्ञानदेव वानखेडे नावाने जात पडताळणी झाली असल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी यासंदर्भात मुंबई, अकोला आणि वाशिम जिल्हा जात पडताळणी समितीकडे समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने झालेल्या जात पडताळणी प्रमाणपत्राचा तपशील मागितला होता. यासंदर्भात मुंबईतील जात पडताळणी समितीने समीर ज्ञानदेव वानखेडे नावाने जात पडताळणी झाली नसल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता वाशिम आणि अकोला जिल्हा जात पडताळणी समितीने देखील अशाच प्रकारची माहिती दिली आहे.

क्रूझ ड्रग्स पार्टी कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यात त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल शंका उपस्थित केलेल्या आहेत. तसेच खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवून फसवणूक केल्याचा आरोपही मलिक यांनी केलेला आहे. त्यानंतर त्यांनी अनेकदा पत्रकार परिषदांमधून यावर भाष्य केले होते. मागासवर्गीय कोट्यातून एनसीबीचे अधिकारी झालेले समीर वानखेडे यांनी नोकरीत रुजू होताना नेमकी कोणती कागदपत्रे सादर केली, असा प्रश्न आता मलिक यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा -OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरील सुनावणी होणार बुधवारी; मतदान मात्र होणार मंगळवारी

ABOUT THE AUTHOR

...view details