मुंबई -राज्यसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे मात्र महाविकास आघाडीचे अद्यापही टेन्शन कमी होताना दिसत नाही आहे. विकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली ( Samajwadi Party in neutral role in Rajya Sabha elections ) आहे. जर पत्राचा उत्तर आले नाही तर राज्यसभा निवडणुकीत तटस्थ राहायचे की नाही. या संदर्भातील निर्णय राष्ट्रीय नेते अखिलेश यादव जे आदेश देणार तो आदेश मांडण्यात येणार असल्याचे मत महाराष्ट्राचे समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी व्यक्त ( Abu Azmi about RS Election Support ) केले आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने...
अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा विकास आघाडी स्थापन करण्यावेळी सेक्युलॅरिझम शब्दाचा वापर करत आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकार कुठल्याही प्रकाराचे सेक्युलॅरिझम प्रमाणे कुठलेही निर्णय घेत नाही आहे, मुस्लिम समाजात संदर्भात आरक्षणाचा विषय असो किंवा इतर विषयासंदर्भात अद्यापही निर्णय घेण्यात आलेले नाही आहेत.