मुंबई - मागील 60 वर्षांपासून साबुदाण्यापासून श्री गणेशाची आकर्षक रांगोळी साकारण्याची परंपरा यंदाही कलाकारांनी कायम ठेवली आहे. मुलुंडमध्ये राहणारे मोहन कुमार दोडेचा, भूपेश जोशी आणि अर्चना पालन या तिघांनी मिळून या वर्षी 25 किलो साबुदाणा वापरून साडेचार बाय पाच फुटाची श्रीगणेशाची रांगोळी साकारली आहे. यासाठी त्यांना 25 दिवस लागले आहेत.
मुलुंडमध्ये सलग 60 वर्षांपासून साबुदाण्यापासून 'श्रीं'ची रांगोळी; कोरोना काळातही परंपरा कायम - mumbai ganesh festival 2020
मागील 60 वर्षांपासून साबुदाण्यापासून श्री गणेशाची आकर्षक रांगोळी साकारण्याची परंपरा यंदाही कलाकारांनी कायम ठेवली आहे. मुलुंडमध्ये राहणारे मोहन कुमार दोडेचा, भूपेश जोशी आणि अर्चना पालन या तिघांनी मिळून या वर्षी 25 किलो साबुदाणा वापरून साडेचार बाय पाच फुटाची श्रीगणेशाची रांगोळी साकारली आहे. यासाठी त्यांना 25 दिवस लागले आहेत.
ही रांगोळी तयार करण्यासाठी दोनशे विविध रंगछटांचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी नागरिक लांबून येतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे रांगोळी प्रेमींना थेट पाहता येणार नाही.
आम्ही गेल्या 60 वर्षांपासून साबुदाण्यापासून गणेशाची कलाकृती तयार करत आहोत. यंदा कोरोनाच्या पाश्वभूमीवर ही कलाकृती घरातच तयार केली आहे. चार बाय पाच अशी ही कलाकृती आहे. कोरोनामुळे यंदा थेट या कलाकृतीचे दर्शन घेता येणार नाही. मात्र आम्ही ऑनलाइन व्यवस्था केली आहे. कारण ही कलाकृती घरात तयार केल्याने लोकांना बोलवणे शक्य नाही, असे मोहन कुमार दोडेचा यांनी सांगितले.
साबुदाण्यापासून श्री गणेशाची कलाकृती तयार करण्याला 60 वर्षांचा इतिहास आहे. यावर्षी कोरोनामुळे हॉल मध्ये तयार करू शकलो नाही. त्यामुळे दरवर्षीची परंपरा कायम राहण्यासाठी ही कलाकृती घरातच साकारली आहे. कलाकृती छोटी असल्यामुळे 200 रंग छटांचा वापर केला आहे. दरवर्षी 300 रंगछटांचा वापर होत असल्याचे भुपेश जोशी यांनी सांगितले.