महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सचिन वाझे दुसऱ्यांदा निलंबित, १२ तास चौकशीनंतर झाली अटक - nia

एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर वाझेंवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर सोमवारी त्यांच्यावर पोलीस खात्यातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वाझेंवरील निलंबनाची ही दुसरी कारवाई आहे.

सचिन वाझेंचे अखेर पोलीस खात्यातून निलंबन
सचिन वाझेंचे अखेर पोलीस खात्यातून निलंबन

By

Published : Mar 15, 2021, 1:12 PM IST

Updated : Mar 15, 2021, 5:20 PM IST

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. एनआयएच्या अटकेनंतर सोमवारी वाझेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अँटिलिया प्रकरणी वाझेंची याआधीच एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई

एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर वाझेंवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर सोमवारी त्यांच्यावर पोलीस खात्यातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वाझेंवरील निलंबनाची ही दुसरी कारवाई आहे. 2 डिसेंबर 2002मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी सचिन वझेंना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 6 जून 2020ला पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले होते.

वाझे 25 मार्चपर्यंत एनआयएच्या कोठडीत

सचिन वाझेंना अटक केल्यानंतर त्यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं ही कोठडी ठोठावली आहे. NIA ने परिस्थितीजन्य पुरावे कोर्टात सादर केले. NIA ने म्हटलं, की "वाझे यांची चौकशी करण्यासाठी कोठडी गरजेची आहे, कारण या प्रकरणाचा तपास अजूनही प्राथमिक स्तरावर आहे. यात चेन ब्रेक करायची आहे. हा मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. यात इतर लोकं सहभागी असण्याची शक्यता आहे. त्या लोकांची चौकशी होणं गरजेचं आहे."

सचिन वाझे दुसऱ्यांदा निलंबित

एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांचे दुसऱ्यांदा निलंबन झालंय .तब्बल 16 -17 वर्षानंतर पोलिस दलात सामिल झालेल्यानंतर अवघ्या 9 महिन्यात ही कारवाई करण्यात आली. वाझेंचे हे निलंबन अँटीलिया निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी निलंबन करण्यात आलंय

कोणकोणत्या प्रकरणात वाझेंवर निलंबधाची कारवाई -

ख्वाजा युनूस प्रकरण -

2 डिसेंबर 2002 रोजी घाटकोपर रेल्वे स्टेशनवर एक ब्लास्ट झाला होता. यात दोघांचा मृत्यू तर 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. यावेळी मुंबईचे आयुक्त एम. एन. सिंह होते. या प्रकरणी वाझे आणि त्यांच्या टीमने डॉ. मतीन, मुजम्मिल, जहीर आणि ख्वाजा यूनूस यांना पोटा अंतर्गत अटक केली. दरम्यान कस्टडीतून ख्वाजा पळून गेल्याची माहिती पोलिसांनी त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आलं. पुढे तपासाअंती ख्वाजाची कस्टडीत डेथ झाल्याचा रिपोर्ट आला (मृतदेह अद्याप हाती नाही). या प्रकरणी चार्जशिट दाखल करण्यात आली. सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई 2004 मध्ये करण्यात आली. त्यानंतर 2007मध्ये वाझेंनी राजीनामा दिला. मात्र तो नामंजूर करण्यात आला.

वाझेंची 17 वर्षानंतर एंट्री -

तब्बल 17 वर्षांनी वाझेंची पोलीस दलात जून 2020 मध्ये एंट्री झाली. वाझे अॅक्शनमध्ये दिसले. वाझेंकडे टीआरपी घोटाळा प्रकरण, ऋतिक रोशन आणि कंगना प्रकरण, तसंच फेक इंस्टाग्रामवर फॉलोअर्स प्रकरण सोपण्यात आली होती.

सचिन वाझेंच्या वकिलांचा युक्तिवाद
वाझे यांच्या वकिलांनी आपली बाजू कोर्टासमोर मांडताना त्यांच्याविरोधात कसलाही पुरावा नसल्याचा दावा केला. "एनआयएने फक्त संशयाच्या आधारावर त्यांना अटक केली आहे, त्यांच्या रिमांडमध्ये आरोपी विरोधात काही पुरावा नाही" असा युक्तिवाद वाझेंच्या वकिलांनी कोर्टात केला.


12 तास चौकशीनंतर एनआयएकडून अटक

एनआयएने शनिवारी 13 मार्च रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सचिन वाझेंना अटक केली. त्यापूर्वी जवळपास 12 तास त्यांची NIA ने चौकशी केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 286, 465, 473, 506 (2), 120 ब आणि 4 (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -संजय राऊत वाझेंना का पाठिशी घालताहेत? भाजपचा शिवसेनेवर निशाणा

Last Updated : Mar 15, 2021, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details