मुंबई -मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी परिसरात उभारण्यात येणाऱ्या सेल्फी पॉईंटला रिपाइं आठवले गटाने विरोध केला आहे. मुंबई महापालिकेकडून चैत्यभूमीवर सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. या सेल्फी पॉइंट विरोधात आज चैत्यभूमी परिसरात आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र, वार्ड ऑफिसरकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भेटण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आरपीआय कार्यकर्त्यांचं चैत्यभूमीवरील आंदोलन रद्द केले आहे.
चैत्यभूमीवरील सेल्फी पॉईंटला आरपीआयचा विरोध हेही वाचा -सुपरमुनचे संपूर्ण देशात मनोहारी दर्शन; नेहरू विज्ञान केंद्राच्या ऑनलाईन कार्यक्रमातही दिसणार
मुंबई महानगरपालिकेकडून दादर चैत्यभूमी परिसरात सेल्फी पॉईंट तयार करण्यात येत आहे. यासाठी काम देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र याला रिपाई आठवले गटाने विरोध दर्शविला आहे. या ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारू नये अशी रिपाईची मागणी आहे. या संपूर्ण विषयासंदर्भात उद्या वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर हे आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांची भेट घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन रद्द करण्यात आलं असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे त्या भागाची पाहणी केली आहे. याबाबत बोलताना आरपीआयचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादूरे म्हणाले की, आम्ही कोरोनाच्या कारणास्तव आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. आम्ही चैत्यभूमीजवळ सेल्फी पॉईंट होऊ देणार नाही.
चैत्यभूमी आमची अत्यंत पवित्र भूमी आहे आणि याठिकाणी पालिकेच्यावतीने सेल्फी पॉइंट उभारण्यात येत आहे. या विरोधात पालिका आयुक्त इक्बाल चहल आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देखील देण्यात आले आहे. या पवित्र ठिकाणी अशाप्रकारे सेल्फी पॉईंट उभारणे योग्य नाही आहे सेल्फी पॉईंट बनवायाच असेल तर याठिकाणी असलेल्या उद्यानात बनवावा असे केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
हेही वाचा -सीबीआय प्रमुखपदी सुबोध कुमार जैस्वाल, राज्यातील 'हे' नेते येऊ शकतात अडचणीत