महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोकसभेच्या निवडणुकीत डिटेक्टीव्हला आले महत्व, प्रतिस्पर्ध्यांवर ठेवताहेत करडी नजर

बंडखोर तसेच जे नाराज असतात अशांवर लक्ष ठेवण्यासाठी हे डिटेक्टिव्ह कधी सामान्य कार्यकर्ता म्हणून भाग घेतात तर कधी पत्रकार म्हणूनही जातात.

लोकसभेच्या निवडणुकीत डिटेक्टीव्हला आले महत्व

By

Published : Apr 2, 2019, 9:56 PM IST

Updated : Apr 2, 2019, 11:44 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर मुंबईसह राज्यातल्या महत्वाच्या लोकसभेच्या जागांवर आपले नशीब आजमावत आहेत. आता प्रचारादरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी डिटेक्टिव एजंटची गरज भासू लागली आहे. आपल्या मतदारसंघात मतदारांना आमिष दाखविण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार काय उद्योग करत आहेत याची माहिती मिळविण्यासाठी सध्या डिटेक्टिव एजंटला कंत्राट दिले जात आहे.

उत्पल चौधरी, संचालक लोटस डेटेकटीव्स

लोकसभा निवडणूका म्हटल्या म्हणजे प्रचार आला. या प्रचाराला जोडून समोरच्याचा प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रचारावर तेवढेच लक्ष ठेवणे गरजेचे असते. या कारणाने प्रतिस्पर्धी उमेदवाराला कोंडीत पकडण्यासाठी आता वेगवेगळे उमेदवार हे डिटेक्टिव्ह एजन्सीचा वापर करताना पाहायला मिळत आहेत. डिटेक्टिव्ह एजन्सीच्या गुप्तहेरांकडून मागवली जाणारी माहिती वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. उमेदवार पैसे वाटतोय का याचे पुरावे गोळा करण्यास या गुप्तहेरांना त्या-त्या उमेदवाराच्या प्रचार रॅलित जाऊन भाग घ्यावा लागतो.

बंडखोर तसेच जे नाराज असतात अशांवर लक्ष ठेवण्यासाठी हे डिटेक्टिव्ह कधी सामान्य कार्यकर्ता म्हणून भाग घेतात तर कधी पत्रकार म्हणून समोर जातात. कधी वाहन चालक म्हणून काम करतात तर कधी बूथ कार्यकर्ता म्हणून. काही ठिकाणी स्वत: उमेदवारांनी तर काही ठिकाणी चक्क पक्षांनी या डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक केली आहे असे असले तरी ही गोष्ट राजकीय पक्ष उघडपणे कबुल करायला तयार नाहीत. मात्र राजकारण, निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद सारख्या गोष्टींचा वापर होतो यात मात्र दुमत नाही.

Last Updated : Apr 2, 2019, 11:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details