महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राष्ट्रवादीच्या या आमदाराला लोकलमध्ये पाहिलंय का? - rohit pawar travel by mumbai local

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुचर्चित आमदार मुंबईत लोकलने प्रवास करत असल्याचे त्यांनी स्वत:च्या सोशल मीडियावर सांगितले. एका कामानिमित्त रेल्वे पकडल्याची माहिती देखील दिली.

rohit pawar travel by mumbai local
कायम विरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देणारे रोहित पवार यांनी तोंडाला मास्क लाऊन अंधेरी ते मीरा रोड प्रवास केला.

By

Published : Dec 8, 2020, 5:56 PM IST

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुचर्चित आमदार मुंबईत लोकलने प्रवास करत असल्याचे त्यांनी स्वत:च्या सोशल मीडियावर सांगितले. एका कामानिमित्त रेल्वे पकडल्याची माहिती देखील दिली. फोटोमधील चेहरा ओळखीचा वाटणं स्वाभाविक आहे. कारण विधानसभा निवडणुकीत जामखेड मतदारसंघात माजी मंत्री राम शिंदे यांना हरवून पवार कुटुंबीयांची 'पॉवर' दाखवून देणारे तरुण आमदार रोहित पवार सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत.

कायम विरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देणारे रोहित पवार यांनी तोंडाला मास्क लाऊन अंधेरी ते मीरा रोड प्रवास केला

नुकताच त्यांनी लोकलने प्रवास केल्याचे फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले. कायम विरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देणारे रोहित पवार यांनी तोंडाला मास्क लाऊन अंधेरी ते मीरा रोड प्रवास केला. आणि या दरम्यान त्यांना कोणीही ओळखलं नाही. एरव्ही कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणारा नेता मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर चालत होता. कोणालाही त्यांच्या उपस्थितीचा संशय आला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे लोकल प्रवास करून रोहित पवार अखेर मीरा रोड स्टेशनवर उतरले आणि पुढील कामाला निघून गेले.

एरव्ही कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणारा नेता मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर चालत होता.

मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलने प्रवास करायचो, असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. काल बऱ्याच दिवसांनंतर अंधेरी ते मीरारोड लोकलने प्रवास करण्याचा योग आला. आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या, असे पवार म्हणाले. कोरोनाच्या संकटावर मात करून आपली लाईफलाइन लवकरच पूर्ववत होईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीच्या या आमदाराला लोकलमध्ये पाहिलंय का?

ABOUT THE AUTHOR

...view details