मुंबई - कुर्ला (पश्चिम) येथील क्रांतीनगर मधील रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी कायम स्वरूपी स्थलांतर करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, अजूनही प्रशासनाने त्यादृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
कुर्ल्यात रस्त्यांवर पाणी, रहिवाशांनी प्रशासनाकडे मागितल्या होड्या
क्रांतीनगर येथील रहिवाश्यांचे पुनर्वसन आधीच झाले असते, तर आज त्यांचे असे हाल झाले नसते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी उपरोधिकपणे आता पुनर्वसन नसेना का, पण पावसाळ्यात वापर करण्यासाठी म्हणून होड्या तरी द्या! अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज कुर्ल्यामध्ये रस्त्यावर सकाळपासून तब्बल दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. नेहरूनगर ते कुर्ला स्थानकापर्यंत रस्त्यावर २ फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांचीदेखील तारांबळ उडाली.
या पावसामुळे क्रांतीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. येथील रहिवाशांचे पुनर्वसन आधीच झाले असते, तर आज त्यांचे असे हाल झाले नसते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी उपरोधिकपणे आता पुनर्वसन नसेना का, पण पावसाळ्यात वापर करण्यासाठी म्हणून होड्या तरी द्या! अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.