महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गरोदर महिलेसाठी रिक्षा थेट रेल्वेच्या फलाटावर, मदत करणारा पोलीस अधिकारी ताब्यात

ट्रेन सुविधा ठप्प असल्याने तिला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्याठीकाणी तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली. दरम्यान प्लेटफॉम वर रिक्षा आणल्याप्रकरणी या पोलीस अधिकाऱ्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विरार रेल्वे स्थानकात रिक्षा थेट फलाटावर

By

Published : Aug 4, 2019, 12:32 PM IST

Updated : Aug 4, 2019, 12:42 PM IST

मुंबई - गरोदर महिलेला रेल्वेपर्यंत नेण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने सकाळी 9 च्या सुमारास एक रिक्षा थेट फलाटवर आणल्याची घटना विरार स्थानकामध्ये घडली आहे. विरारमध्ये सकाळपासून मुसळधार बरसत असलेल्या पावसामुळे एक गरोदर महिलेला रुग्णालयात जाण्यास अडचण निर्माण झाली होती. तिला प्रसूतीकळा जाणवत असल्याने तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने तिला एका रिक्षात बसवून विरार स्थानकात आणले. त्यावेळी ती रिक्षा थेट फलाट क्र. २ वरील महिला डब्ब्या जवळ आणण्यात आली होती.

गरोदर महिलेसाठी रिक्षा थेट रेल्वेच्या फलाटावर, मदत करणारा पोलीस अधिकारी ताब्यात

गर्भवती महिलेला तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून पोलिसांनी रिक्षाला फलाटवर नेण्याची परवानगी दिली खरी मात्र, अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी भरल्यामुळे लोकल सुविधा ठप्प आहे. त्यामुळे तिला पुन्हा नजीकच्या रुग्णालयात नेण्यात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली. दरम्यान प्लॅटफॉम वर रिक्षा आणल्याप्रकरणी या पोलीस अधिकाऱ्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Last Updated : Aug 4, 2019, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details