महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fatal attack passenger :  दादागिरी करत रिक्षाचे भाडे घेणाऱ्या चालकाला जाब विचारला म्हणुन प्राणघातक हल्ला

दादागिरी करून बेशिस्तपणे भाडे घेणाऱ्या रिक्षा चालकांना विरोध (Protest against rickshaw pullers charge unruly fares) केला म्हणून ऐरोली रिक्षा स्टँडच्या एका पदाधिकाऱ्यावर इतर प्राणघातक हल्ला (rickshaw driver fatal attack ) करण्यात आला. घडलेल्या प्रकारामुळे ऐरोलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिक्षा स्टॅन्ड पदाधिकाऱ्यावर रिक्षा चालकाचा प्राणघातक हल्ला
रिक्षा स्टॅन्ड पदाधिकाऱ्यावर रिक्षा चालकाचा प्राणघातक हल्ला

By

Published : Sep 19, 2022, 7:31 PM IST

Fatal attack passenger : दादागिरी करत रिक्षाचे भाडे घेणाऱ्या चालकाला जाब विचारला म्हणुन प्राणघातक हल्ला

नवी मुंबई: दादागिरी करून बेशिस्तपणे भाडे घेणाऱ्या रिक्षा चालकांना विरोध (Protest against rickshaw pullers charge unruly fares) केला म्हणून ऐरोली रिक्षा स्टँडच्या एका पदाधिकाऱ्यावर इतर प्राणघातक हल्ला (rickshaw driver fatal attack ) करण्यात आला. घडलेल्या प्रकारामुळे ऐरोलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


अतिरिक्त भाडे घ्यायचा: ऐरोली स्थानकाजवळ शेअरिंग ऑटोचा स्टॅन्ड आहे. या स्टॅन्ड मध्ये गोलू उर्फ सत्यम गुप्ता नावाचा रिक्षावाला नियमाला न जुमानता त्याला हवे तसे भाडे आकारत मध्येच रिक्षा घालून रिक्षा चालवीत असे. जर कोणी विरोध केला तर गोलू त्याच्याशी भांडण करत असे. 17 तारखेला गोलू याने रिक्षामध्ये घालून पुन्हा दादागिरी केली. याचा जाब रिक्षा चालक स्टॅन्डचे पदाधिकारी हेमंत म्हात्रे यांनी त्याला विचारला गोलू याने त्याच्या दोन साथीदारांसह हेमंत म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व यामध्ये हेमंत म्हात्रे हे गंभीर जखमी झाले आहेत.


ऐरोलीत गुन्हा दाखल: लायसन्स बॅच नसूनही शिस्तीत रांगेत न लावता वेडीवाकडी रिक्षा उभी करून दमदाटी करून प्रवासी ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात भरले जात. त्याला परवाना धारक रिक्षा स्टँडचे पदाधिकारी व सदस्य नेहमीच विरोध करत. असाच विरोध केल्याने ऐरोली रिक्षा स्टँडचे पदाधिकारी हेमंत म्हात्रे यांच्यावर लायसन्स बॅच नसणाऱ्या रिक्षावाल्यांनी प्राणघातक हल्ला केला. म्हात्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत गोलू व त्याचे दोन साथीदार यांच्यावर ऐरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी सुद्धा अनेक घटना घडल्या आहेत, गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु कारवाई होत नसल्याने या लोकांचे फावत आहे. घडलेल्या प्रकारामुळे ऐरोलीतील नागरिक व रिक्षा परवाना धारक मालक व चालक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details