महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

12th Result : बारावीचा निकाल आज जाहीर होणार, 'या' वेबसाईट्सवर बघा तुमचा निकाल

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या 12 वीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 3 ऑगस्ट दुपारी १२ वीचा निकाल जाहीर होणार, असे स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.

12th Result
12th Result

By

Published : Aug 2, 2021, 7:36 PM IST

Updated : Aug 3, 2021, 2:52 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या १२ वीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 3 ऑगस्ट दुपारी १२ वीचा निकाल जाहीर होणार, असे स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.

हेही वाचा -विमानतळाची मालकी अदानी समुहाकडे, मात्र नाव बदलण्याचे अधिकार नाही - मंत्री नवाब मलिक

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पद्धतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मुल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मुल्यमापनातील विषयनिहाय प्राप्त गुण, तसेच इयत्ता १२ वीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत व तत्सम मुल्यमापनातील प्राप्त गुणांनुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार तयार करण्यात आलेला १२ वीचा निकाल ३ ऑगस्टला दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे.

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच, www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या संकेतस्थळावर पहा निकाल

१. https://hscresult.11 thadmission.org.in
२. https://msbshse.co.in
3. hscresult.mkcl.org
४. mahresult.nic.in

हेही वाचा -दिलासादायक! राज्यात ३३ पालिकांसह काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर शून्य, आरोग्य विभागाची माहिती

Last Updated : Aug 3, 2021, 2:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details