मुंबई- भांडुप रेल्वे स्थानकात फलाटावरील छताच्या डागडुजीसाठी पत्रे काढण्यात आले आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर छत नसल्याने लोकलच्या प्रतीक्षेतील प्रवाशांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. येथील प्रवासी स्थानकावरील पुलाच्या खांबाचा उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी आधार घेत आहेत.
भांडुप स्थानकात डागडुजीचे काम, भर उन्हात प्रवाशांना करावी लागतेय लोकलची प्रतीक्षा - मुंबई
भांडुप रेल्वे स्थानकात फलाटावरील छताच्या डागडुजीसाठी पत्रे काढण्यात आले आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर छत नसल्याने लोकलच्या प्रतीक्षेतील प्रवाशांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत.
भांडुप स्थानकात डागडुजीचे काम, भर उन्हात प्रवाशांना करावी लागतेय लोकलची प्रतीक्षा
भांडुप स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वरील मध्यभागातील व कल्याण दिशेकडील काही भागावरील छताच्या डागडुजीसाठी पत्रे काढण्यात आले आहेत. स्थानकावरील छताचे काम संथ गतीने चालू असल्याने प्रवाश्यांना उन्हाच्या झळाचा त्रास होत आहे. त्यामुळे काही प्रवासी महिला, जेष्ट नागरिक स्थानकावरील नवीन पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर बसत आहेत. तर भांडुप रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिम दिशेला रिक्षा स्टँड आणि अनधिकृत फेरीवाले बसल्याने भांडुपकरांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.