मुंबई - कोरोना-लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आणि बांधकाम व्यावसायाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली आहे. त्यानुसार उद्यापासून 5 टक्क्यांऐवजी 3 टक्क्यांप्रमाणे मुद्रांक शुल्क आकारणी केली जाणार आहे. पण उद्या विसर्जणानिमित्त मुंबईसह काही जिल्ह्यात सुट्टी असणार आहे. तर त्याचवेळी 2 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेता मंगळवारी मुंबईसह राज्यातील सर्व मुद्रांक आणि नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी कार्यालयाने घेतला आहे. उद्या शक्य तितके दस्तऐवज जमा करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे उद्या ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन मुद्रांक शुल्क भरण्यास प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत 2 टक्के तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत 3 टक्के मुद्रांक शुल्क लागू केले आहे. सध्या 5 टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. तेव्हा ही कपात फार मोठी आणि दिलासादायक आहे. त्यामुळेच कपात जाहीर झाल्याबरोबर अनेकांनी 1 सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांत मुद्रांक शुल्क भरणाऱ्याची संख्या कमी झाली असल्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाच्या जल्लोषाला पितृपक्षाचा फटका; 'या' कार्यालयाला राहणार नाही उद्या सुट्टी - गणेशोत्सवात नोंदणी कार्यालय राहणार सुरू
सरकारने 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत 2 टक्के तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत 3 टक्के मुद्रांक शुल्क लागू केले आहे. सध्या 5 टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. तेव्हा ही कपात फार मोठी आणि दिलासादायक आहे. त्यामुळेच कपात जाहीर झाल्याबरोबर अनेकांनी 1 सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे.
1 सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्क भरणाऱ्याची संख्या वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. पण 1 सप्टेंबरला विसर्जन असून या दिवशी मुंबई, पुणे, नाशिकसारख्या जिल्ह्यात सुट्टी असते. त्यामुळे 2 सप्टेंबरपासून ग्राहकांना-बिल्डराना मुद्रांक शुल्क भरता येणार आहे. मात्र, तेव्हा पितृपक्ष सुरू होणार असल्याने आणि पितृपक्षात घर खरेदी-नोंदणी वा मुद्रांक शुल्क भरणे असे कोणतेही व्यवहार केले जात नाहीत. भारतीय मानसिकतेनुसार या काळात असे व्यवहार करणे अशुभ मानले जाते. याचा परिणाम दरवर्षी बांधकाम व्यावसाय आणि मुद्रांक-नोदणीवर दिसून येतो.
ही बाब लक्षात घेता कोरोना काळातही आणि विशेष सवलत दिली असतानाही पितृपक्षात ग्राहक-बिल्डर मुद्रांक शुल्क नोंदणी करण्यास पुढे येण्याची शक्यता नाही. असे झाल्यास पुढील दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ महसूल कमी मिळण्याची भीती लक्षात घेता मुंबईसह राज्यभरातील नोंदणी कार्यालये उद्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा उद्या सुट्टीच्या दिवशी मुंबईकर ग्राहकांनाही मुद्रांक शुल्क तेही सवलतीच्या दरात भरता येणार आहेत.